शेतकऱ्यांना पीक कर्ज, शिक्षण कर्ज अशा विविध कर्जासाठी अडवणूक झाल्यास खपवून घेणार नाही- आ.अभिजीत पाटील

पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार अभिजीत पाटील ॲक्शन मोडवर

शेतकऱ्यांना पीक कर्ज,शिक्षण कर्ज अशा विविध कर्जासाठी अडवणूक झाल्यास खपवून घेणार नाही- आमदार अभिजीत पाटील

कर्जासाठी कसलीही अडचण आल्यास तात्काळ मला संपर्क करा मी शेतकरी, विद्यार्थी यांच्यासोबत- आमदार अभिजीत पाटील

तालुका कर्ज वाटप समिती नॅशनल,सहकारी तसेच खाजगी बँकेकडून घेतला आढावा – दत्तक बँकांची अट न घालता शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावे

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०९/२०२५ – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर पंचायत समिती शेतकी सभागृह येथे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते.

तसेच तालुका कर्जवाटप समिती आढावा बैठक आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी सर्व नॅशनल,सहकारी तसेच खासगी बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना पीक कर्ज तसेच शिक्षण कर्ज, आण्णासाहेब पाटील,उमाजी नाईक,संत रोहीदास,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अशा तब्बल १८ महामंडळांना कर्ज देण्यासाठी अडवणूक केल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.इथून पुढे शेतकऱ्यांना सिव्हिलची अट न घालता लवकरात लवकर सर्व कर्ज वाटप करण्यात यावे.

कायमच चर्चेत राहिलेले आमदार अभिजीत पाटील यांनी तीन अधिवेशनामध्ये मतदार संघातील अनेक समस्या विधिमंडळात मांडल्या आहेत. सर्वसामान्य जनतेची काम सुरळीतपणे व्हावी यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले असून यातून अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या सुटल्याने नागरिकां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या जनता दरबारामध्ये पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपापल्या समस्या,अडचणी व मागण्या मांडल्या.नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी व निवेदनांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

जनतेच्या अडचणींवर थेट संवाद साधून तत्काळ निर्णय घेण्याची संधी नागरिकांना मिळाली.या माध्यमातून पंढरपूर तालुक्या तील नागरिकांच्या पिक कर्ज, विविध प्रश्न आणि मागण्या प्राधान्याने सोडविण्याचे काम करणार आहे.तसेच शेतकऱ्यांना पिक कर्ज, शिक्षण कर्ज अशा विविध कर्जासाठी अडवणूक झाल्यास खपवून घेणार नाही. दत्तक बँकांची अट न घालता शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावे. कर्जासाठी कसलीही अडचण आल्यास तात्काळ मला संपर्क करा मी शेतकरी, विद्यार्थी यांच्यासोबत असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top