स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा – सिईओ कुलदीप जंगम
स्वच्छोत्सव ही थीम
अभियान कालावधी दि.17 सप्टेंबर 2025 ते दि. 2 ऑक्टोबर 2025
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२५ – स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. त्यास अनुसरुन स्वच्छता ही सेवा (SHS) मोहिम दि.17 सप्टेंबर 2025 ते दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे.
या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2025 साठी स्वच्छोत्सव ही थीम निश्चित केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये दि.२ ऑक्टोंबरपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

दि.17 सप्टेंबर 2025 रोजी स्वच्छता ही सेवा मोहीमेचा शुभारंभ तालुकास्तर व गावस्तरावर परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवून करण्यात आहे.
स्वच्छता लक्ष युनिट (CTUs) –
अस्वच्छ ठिकाणांची निवड करुन सदर ठिकाणांची मॅपिंग करून त्या ठिकाणाची साफ़सफ़ाई करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता –
जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणांची परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे.
सफाई मित्र सुरक्षा शिबिरे
सफ़ाई मित्रासाठी एक खिडकी योजना राबविल्या जाणार असून यामध्ये सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांसाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.सर्व सफ़ाई मित्रांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुका पातळीवर डिग्निटी कॅम्पचे आयोजन करुन वैयक्तीक लाभाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ सफाई मित्रांना देण्यात येणार आहे.
क्लीन ग्रीन उत्सव – पर्यावरणपुरक व शुन्य कचरा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
प्रबोधनपर उपक्रम – स्वच्छ सुजल गाव, कच-यापासुन कलाकृती,स्वच्छ स्ट्रीट फ़ुड, प्लास्टिक संकलन केंद्र उभारणी इत्यादी साठी जनजागृती करण्यात येणार आहे.
एक दिवस,एक तास,एक साथ – या महास्वच्छता उपक्रमांतर्गत दि.25 सप्टेंबर 2025 रोजी देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात येणार असून या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व गाव स्तरावरील सर्व घटकांना सहभागी करुन मोठ्या स्वरुपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गाव आणि स्वच्छ सुजल गाव विशेष ग्रामसभेद्वारे घोषित करता येतील.या विशेष ग्रामसभा दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधित कधीही आयोजित करता येणार आहेत.या द्वारे मोहिम कालावधित जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव आणि स्वच्छ सुजल गाव, हर घर जल म्हणुन घोषीत करणार असल्याचे जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले.
स्वच्छता ही सेवा 2025 मधील सर्व उपक्रम केंद्र शासनाच्या विशेष तयार केलेल्या IT पोर्टलवर (https://swachhatahiseva.gov.in/) अपलोड करण्याची सुविधा असल्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येणा-या सर्व उपक्रमांचे याद्वारे शासन स्तरावरुन सनियत्रंण केल्या जाणार आहे.स्वच्छता ही सेवा 2025 या अभियानातील सर्व उपक्रम ग्रामपंचायत यांनी प्रभावीपणे राबविण्यात यावे असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.