खासदार प्रणिती शिंदे यांच्या स्वखर्चातून उभारलेल्या येवती येथील स्मशानभूमीचे लोकार्पण

खासदार प्रणिती शिंदे यांच्या स्वखर्चातून उभारलेल्या येवती येथील स्मशानभूमीचे लोकार्पण

गावकऱ्यांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता

खासदार प्रणिती शिंदे यांनी येवती,खवणी व सारोळे गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या घेतल्या जाणून

येवती ता.मोहोळ |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ सप्टेंबर २०२५ – सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील येवती,खवणी व सारोळे गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

तसेच खासदार प्रणिती शिंदे यांच्या स्व खर्चातून उभारण्यात आलेल्या येवती येथील स्मशानभूमीचे लोकार्पण खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पार पडले.

गावकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रमुख मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.या कामामुळे गावाला एक महत्त्वाची आणि मूलभूत सुविधा उपलब्ध झाली आहे.

या कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे एकमुखाने आभार मानले.ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले की,स्मशानभूमीच्या अभावामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.परंतु आजपासून गावाला मोठा दिलासा मिळाला असून खासदार शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे गावाची महत्त्वाची समस्या सुटली आहे.

खासदार प्रणिती शिंदे ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाल्या,मोहोळ सह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाची समस्या माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. स्मशानभूमीत लोक दुःखाच्याप्रसंगी जातात त्यामुळे स्वच्छ, व्यवस्थित सन्मानजनक जागा असणे अत्यंत आवश्यक आहे. येवती गावातील स्मशानभूमी ही केवळ एक सुविधा नसून गावकऱ्यांच्या सन्मानाशी जोडलेला प्रश्न होता. गावकऱ्यांची दीर्घकाळची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान मला आहे.लोकप्रतिनिधी म्हणून मी केवळ विकासकामे करणेच नव्हे तर नागरिकांच्या भावनांना स्पर्श करणाऱ्या योजनाही प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. भविष्यातही येवती गावाला आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी खवणी व सारोळे गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकरी,महिला, युवकांशी संवाद साधून गावातील रस्ते, पाणी,वीज,शिक्षण,आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर सातत्याने काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सांगितले व आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनामार्फत राबविण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार,येवती चे सरपंच भाग्यश्री खुर्द,माजी सरपंच विक्रमसिंह पाटील, सारोळे चे सरपंच शाहीर सलगर, खवणी चे सरपंच शीतल यमगर, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार,ज्येष्ठ नेते तात्या गोडसे,कुमार गोडसे,आनंद पाटील, शामराव काळे पाटील, कामराज चव्हाण, तेजस बोबडे,सतीश खिलारे, तुकाराम भोसले, बंडू खुर्द, मौला बागवान, अतुल भोसले, गणेश खुर्द, अजितसिंह भोसले, बाबा गाडे,अनिल शिंगाडे, पूजाताई खिलारे, सुनील खुर्द यांच्यासह पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,माजी सरपंच,महिला कार्यकर्त्या, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top