आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनी मानव मंदिर पंढरपूर येथे वृद्धांचा झाला सन्मान

आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त मानव मंदिर पंढरपूर येथे वृद्धांचा झाला सन्मान

देवाने माणसाची नव्हे तर माणसानेच देव आणि देवळाची निर्मिती केली आहे – नागनाथ पांढरे

आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त मानव मंदिर पंढरपूर येथे वृद्धांना पंचपक्वानांचे भोजन

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- स्वतःच्या कुटुंब व समाज व्यवस्थेने नाकारलेल्या पण बीईग वुमन फाउंडेशनच्यावतीने त्या अत्यंत गरजू व निराधार अनाथांना आधार देण्यासाठी सुरू केलेल्य अनाथ आश्रम पंढरपूर मधील वृद्ध नागरिकांचा मेरा युवा भारत सोलापूर व संघर्ष नेहरू युवा मंडळ वाखरी यांच्या संयुक्त विद्यमाने मानव मंदिर पंढरपूर यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त दि.1 ऑक्टोंबर रोजी आदरपूर्वक सन्मान करून त्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.

याप्रसंगी बोलताना संघर्ष नेहरू युवा मंडळ वाखरी संचलित मानव मंदिर पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ पांढरे म्हणाले की,देवाला जर या पृथ्वीवर यावे असे वाटले तरी कोणत्यातरी माणसाने त्याला स्वीकारल्याशिवाय स्वतःचे देवत्व सुद्धा त्याला सिद्ध करता येत नाही.प्रत्येकाने किमान आपापल्या आई बापाची व आजी आजोबांची तसेच सर्वच वयोगटातील सर्व मानवांची मनापासून सन्मानपूर्वक सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा असून सध्याच्या व पुढील काळातील प्रमुख गरज व आवश्यकता आहे.आपण आपल्या कुटुंबातील वृद्ध लोकांशी कसे वागतो याचे आपल्या घरातील लहान मुलं निरीक्षण व अनुकरण करीत आहेत याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही.आपल्याला आपल्या संतांनी सांगितल्याप्रमाणे तीर्थस्थळी फक्त भोजन, प्रसाद, पाणी, धोंडा, पाने, फुले आणि हार आहे पण तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी या एका वाक्यातच पूर्ण मानवी जीवनाचा सार सांगितला असून आपल्या संतांचे किमान एवढे एक वाक्य जरी आपण सर्वांनी खऱ्यानेच आत्मपरीक्षण करून मनापासून आचरणात आणले तरी आपल्या मानवी जन्माचे सार्थक होऊन खऱ्यानेच जिवंत असणाऱ्या माणसातच आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेरा युवा भारत सोलापूरचे जिल्हा युवक अधिकारी राहुल डोंगरे आणि त्यांचे सहकारी भानुदास यादव,सुभाष चव्हाण, संघर्ष नेहरू युवा मंडळ वाखरी संचलित मानव मंदिर पंढरपूरचे सर्व पदाधिकारी तसेच बीईग वुमन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सलमान अत्तार त्यांचे सहकारी सलमान शेख व त्यांच्या सर्व कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Back To Top