चाहूल पावसाची
काळ्या ढगांनी व्यापले गगन,
पहिल्या सरींनी धरतीचे मोकळे मन।
डोंगर माथ्यावर पांघरले धुके,
झाडांच्या पानांवर चमकती थेंब सुखे।

धबधबे उंचावरून झेपावती जलधारा,
गडगडाटी निनादांनी दरी-दरींमध्ये सारा।
नदीच्या पात्रात पाणी नाचते थरथरून,
लाटांमध्ये उमटते गाणी गूढ सांगून।
हिरव्या गालीच्याने सजली धरती,
मातीच्या सुवासाने भरली निसर्गाची कोंदणवाटी।
शुद्ध वाऱ्याच्या स्पर्शाने हलते मन,
पावसाळ्याच्या सुरुवातीला सापडते जीवन।
~ प्रीती प्रशांत माळवदे
पंढरपूर
