शिवरत्न वीर जिवबा महाले यांची ३९० वी जयंती पंढरपूर सकल नाभिक समाजाच्यावतीने साजरी
गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात जिवबा महाले जयंती निमित्त वृद्धांना मिष्ठान्न भोजन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – छञपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी म्हणून वाचले होते शिवाजी ही म्हण सुवर्ण अक्षरात इतिहासात ज्यांच्या कार्यामुळे लिहिले गेली असे स्वामीनिष्ठ दानपट्टाबाज शुरविर शिवरत्न वीर जिवबा महाले यांची ३९० वी जयंती पंढरपूर सकल नाभिक समाजाच्या वतीने श्री.संत सेना महाराज मठ येथे साजरी करण्यात आले.

पंढरपूर सकल नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक ह.भ.प.बबन शेटे,डॉ.अशोक माने,डॉ.प्रदिप भोसले,नवनाथ जगताप यांच्या हस्ते जिवबा महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे जिवबा महाले यांच्या जयंती निमित्त वृद्ध नागरिकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.

त्याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संघटक जितेंद्र भोसले,श्री संत सेना महाराज समाधी सोहळ्याचे अध्यक्ष निलेश शिंदे, सोलापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष दत्तात्रय भुसे, पंढरपूर तालुकाध्यक्ष विनोद जगताप, उपाध्यक्ष सुनिल माने,पंढरपूर शहर सलून दुकान मालक संघटनेचे चेअरमन साईनाथ शिंदे,व्हाचेअरमन अनिल शेटे,दिपक सुरवसे,सखाराम खंडागळे,मनोज गावटे, बाळासाहेब शेटे ,स्वरुप चव्हाण, अभिजीत चव्हाण आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश चव्हाण व तुकाराम चव्हाण यांनी परिश्रम घेतले.