जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवेढा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवेढा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय व पंचायत समिती गणनिहाय प्रारुप मतदार यादी दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालय, मंगळवेढा तसेच गावांमधील तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तालुक्यातील नागरिकांनी ही प्रारुप मतदार यादी कार्यालयीन वेळेत पाहावी,असे आवाहन करण्यात आले आहे.प्रारुप मतदार यादीसंदर्भात आक्षेप किंवा हरकती असल्यास त्या दि. 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व तहसिल कार्यालय मंगळवेढा येथे लेखी स्वरूपात विहित पद्धतीने सादर कराव्यात.

विहित कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही,असे तहसीलदार मदन जाधव यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Back To Top