मोबाईल वापरकर्त्यांसाठी 1 सप्टेंबर 2021 पासून बदलणार हे पाच नियम

मोबाईल वापरकर्त्यांसाठी 1 सप्टेंबर 2021 पासून बदलणार हे पाच नियम These five rules will change for mobile users from September 1, 2021
  नवी दिल्ली,२५/०८/२०२१ -  मोबाईल वापर कर्त्यांसाठी 1 सप्टेंबर 2021 पासून 5 नियम  बदलणार आहेत.यामुळे वापरकर्त्यांच्या खिशा वर परिणाम होणार आहे . नवीन नियमांनुसार, जर मोबाइलवर Disney Plus Hotstar वापरत असाल तर महागडे रिचार्ज करावे लागणार आहेत  यासोबतच अँमेझॉन, गुगल, गुगल ड्राइव्ह सारख्या सेवांचे नियमही बदलले जात आहेत. हे बदल 1 आणि 15 सप्टेंबर 2021 पासून प्रभावी होणार आहेत. नियमांमध्ये बदल झाल्यानंतर मोबाईल वापरकर्त्यांना अनेक सेवांसाठी जादाचे पैसे मोजावे लागतील.
बनावट सामग्रीचा प्रचार करणाऱ्या अँपवर बंदी घालण्यात येणार

1 सप्टेंबर 2021 पासून गुगलचे नवीन धोरण लागू केले जात आहे. यात बनावट आशयाला प्रोत्साहन देणाऱ्या अँप्सवर 1 सप्टेंबरपासून बंदी घालण्यात येणार आहे. गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे की अँप जे डेव्हलपर्सनी बर्याच काळापासून वापरले नाहीत ते ब्लॉक केले जातील. वास्तविक, गुगल प्ले स्टोअरचे नियम पूर्वीपेक्षा कडक केले जात आहेत. त्याच वेळी, Google ड्राइव्ह वापरकर्त्यांना 13 सप्टेंबर रोजी नवीन सुरक्षा अपडेट मिळेल. यामुळे त्यांचा वापर पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल.

फसव्या वैयक्तिक कर्ज अँप्सवर बंदी

15 सप्टेंबर 2021 पासून Google Play Store साठी नवीन नियम लागू केले जात आहेत. याअंतर्गत कर्ज मिळवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या शॉर्ट पर्सनल लोन अँप्सवर भारतात बंदी घालण्यात येणार आहे. अशा 100 अँप्सबद्दल तक्रार करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर गुगलने अशा अँप्ससाठी नवीन नियम लागू केलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: