डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून अध्यापक विद्यालयामध्ये साजरा

अध्यापक विद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून येथील अध्यापक विद्यालयामध्ये साजरा

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/१०/२०२५ – आज डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यापक विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमापूजन तसेच काही निवडक पुस्तकांचे पूजन करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.आर.वाघमारे उपस्थित होते.विद्यार्थी कु.श्वेता करडे, कु.सानिका घाडगे यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

शिक्षक मनोगतामध्ये श्री पाडवी सर,श्री.आवताडे सर,श्री गंगथडे सर यांनी वाचनाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले.ते म्हणाले की आई वडिलांकडे एखाद्या गोष्टीसाठी जसा हट्ट करता तसाच कधीतरी पुस्तकांसाठीही हट्ट करा. आपले वाचन वाढवा त्यातुन आपले ज्ञान वाढेल.

प्राचार्य श्री वाघमारे सरांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना त्यांना प्रेरणा देण्यासाठी जी मुलं जास्तीत जास्त पुस्तक वाचतील अशा विद्यार्थ्यांचा आम्ही विद्यालयाच्यावतीने सन्मान करू असे जाहीर केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शर्मिला खुणे मॅडम यांनी केले.उपस्थित मान्यवरांचे सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होता.

Leave a Reply

Back To Top