भेसळयुक्त खतामुळे अंजनगाव खे. येथील द्राक्षबाग जळाली; आमदार अभिजीत पाटील यांची तात्काळ पाहणी
भेसळ खताचा फटका: माढा तालुक्यातील द्राक्षबागेचे मोठे नुकसान,आमदार अभिजीत पाटील यांचे कठोर आदेश
अंजनगाव खे. ता.माढा येथील शेतकऱ्याच्या द्राक्षबागेला भेसळयुक्त खतामुळे मोठे नुकसान झाले असून आमदार अभिजीत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करत दोषींवर कारवाईचे निर्देश दिले.
माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०१/२०२६- अंजनगाव खे.ता.माढा येथील शेतकरी विश्वनाथ हरिभाऊ पांढरे यांच्या द्राक्षबागेचे भेसळयुक्त खतामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ती द्राक्षबाग जळाल्याची गंभीर घटना लक्षात घेत माढा विधानसभेचे आमदार अभिजीत धनंजय पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पाहणी केली.
यावेळी खत कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आमदार पाटील यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.संबंधित खताचे नमुने हैदराबाद येथील अधिकृत प्रयोगशाळेत पाठवून चौकशी करण्यात यावी तसेच दोषी कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले.
बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट निर्देश देत कृषी विभागाला लेखी नोटीस देण्यास सांगण्यात आले आहे.शेतकऱ्यांची कोणतीही चूक आढळल्यास त्याची जबाबदारी स्वतः स्वीकारू,असे ठाम आश्वासन आमदार अभिजीत पाटील यांनी दिले.


