मारोळी–शिरनांदगी रस्ता खोदून सरकारी मालमत्तेचे १.५० लाखांचे नुकसान — तिघांविरुद्ध गुन्हा

मारोळी–शिरनांदगी रस्ता खोदून सरकारी मालमत्तेचे १.५० लाखांचे नुकसान — तिघांविरुद्ध गुन्हा

अनाधिकृत पाईपलाईनसाठी रस्त्याची साईडपट्टी खोदली; जिल्हा परिषद अभियंत्याच्या तक्रारीवरून कारवाई सुरू

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मारोळी ते शिरनांदगी या सार्वजनिक रस्त्याची साईडपट्टी आणि साईड गटार अनधिकृतपणे खोदून पाईपलाईन टाकण्याच्या कृत्यातून तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचे सरकारी नुकसान झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी महेश नागाप्पा जमखंडी, महंतेश नागाप्पा जमखंडी आणि बसवराज बिराजदार (सर्व रा. मारोळी) या तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाची माहिती अशी की फिर्यादी प्रशांत चाबुकस्वार शाखा अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार , दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी ११ ग्रामस्थांच्या उपस्थितीत मारोळी– शिरनांदगी रस्त्याची पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान पुढील गोष्टी निदर्शनास आल्या – रस्त्याच्या एकूण १,६५० मीटर अंतरात उजव्या बाजूची साईडपट्टी खोदण्यात आली होती.साईड गटार देखील खोदून त्याचे नुकसान झाले होते.काही ठिकाणी अनधिकृत पाईपलाईन बसविण्यात आली होती.ही पाईपलाईन मारोळी गावातील गट नंबर १३४ या शेतात जात असल्याचे स्पष्ट झाले.

सरकारी मालमत्तेचे नुकसान, रस्त्याची संरचना बिघडविणे आणि परवानगी शिवाय केलेल्या पाईपलाईन कामामुळे संबंधित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Back To Top