प्रदीप राऊत सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन यांनी दिला आठवणींना उजाळा

प्रदीप राऊत सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन यांनी दिला आठवणींना उजाळा Pradeep Raut, Assistant Commissioner, Food and Drug Administration
प्रदीप राऊत सहाय्यक आयुक्त ,अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांचा जैन संघटनांच्यावतीने सन्मान
सोलापूर ,संदेश गांधी : - कोरोना कालावधीमधे अत्यंत कठिण परिस्थिती उत्तमरित्या हाताळुन, सामान्य जनतेला आधार देण्याचे कार्य केले व अजुनही करत आहात याकरिता श्री सन्मती सेवा दल बहुद्देशीय अल्पसंख्यांक संस्था, श्री भारत वर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, भारतीय जैन संघटना आणि सैतवाळ महासंघ यांच्यावतीने प्रदीप राऊत सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांचा त्यांच्या कार्यालयामधे जाऊन शाल, श्रीफल व माला देऊन सन्मान करण्यात आला.

     यावेळी श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक  अध्यक्ष मिहीर गांधी, अकलुज,भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र उपाध्यक्ष, उद्योजक अनिल जमगे, भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष शाम पाटील, सैतवाळ महासंघाचे अध्यक्ष रवींद्र कटके,प्रा.मनिष शहा,संदेश गांधी भिमानगर, हितेश दोशी, सुरेंद्र दोभाडा आदी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 याप्रसंगी बोलताना प्रदीप राऊत यांनी कोरोना कालावधीमधील अनेक प्रसंग कशा पद्धतीने हाताळले, आपण स्वतः कोरोना  संकटातून कसे बाहेर पडलो याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. भिमानगर (उजनी धरण) येथील वास्तव्य आणि आठवणींना उजाळा दिला.

   प्रदीप राऊत सहाय्यक आयुक्त यांच्या हातून असेच कार्य भविष्यातील घडत राहो आणि सरांचे लवकरच प्रमोशन व्हावे अशा सर्व संघटनांच्या पदाधिकारी यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: