पंढरपूरात स्तुत्य उपक्रमातून डॉ बाबासाहेबांना अभिवादन; रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरपूरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर; भीमसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
महेश कसबे मित्र मंडळाचा समाजहिताचा उपक्रम; रक्तदानातून महामानवांना अभिवादन
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१२/२०२५ –भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंढरपूरात स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.ॲड.महेश कसबे मित्र मंडळाच्या वतीने आणि आरपीआय नेते दीपक चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन शहरातील स्मारक सभागृहात करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून झाली. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
समाजहिताच्या उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेणारे ॲड. महेश कसबे मित्र मंडळ पंढरपूरातील जयंती, पुण्यतिथी तसेच यात्रा उत्सवांमध्ये सातत्याने सामाजिक कार्य राबवत असून या परंपरेला उजाळा देत महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला भीमसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदानाद्वारे डॉ बाबासाहेबांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करत अनेकांनी सहभाग नोंदवला.

या शिबिराला प्रणिती ताई भालके, भगिरथ भालके यांनी सदिच्छा भेट दिली.
या कार्यक्रमास आरपीआयचे जितेंद्र बनसोडे, मुकुंद मागाडे, आर.पी. कांबळे, भाजपा शहराध्यक्ष रोहित पानकर, एड. राजेश चौगुले,माजी नगरसेवक किरण घाडगे, सुधीर धोत्रे, धनंजय कोताळकर, एड.अमरसिंह देशमुख,आय.एम. कडगे, काकासाहेब केंगार,शैलेश आगावणे, अमित कसबे, सुधाकर बंदपट्टे, राहुल चंदनशिवे,सुधीर सोनटक्के,सुनील पवार, बुद्धभूषण चंदनशिवे,विकी कसबे,श्रीनाथ बाबर, अनिल माने,अक्षय आठवले, एकनाथ वाघमारे, पिंटू कांबळे, ब्रह्मदेव वाघमारे, अमर सूर्यवंशी, अजिंक्य ओव्हाळ, दीपक साबळे, बाळासाहेब सर्वगोड यांची उपस्थिती होती.


