प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार सौरक्षण सेना राहाता तालुका अध्यक्षपदी

प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे माहिती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार सौरक्षण सेना राहाता तालुका अध्यक्षपदी Prof.Dnyaneshwar Bansode as Right to Information, Police Friend and Patrakar Saurakshan Sena Rahata Taluka President

राहाता /प्रतिनिधी - राहाता तालुक्यतील साकुरी येथील दलित रत्न पुरस्कार विजेते प्रा ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या कार्याच दखल घेऊन त्यांची माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार सौरक्षण सेनेच्या राहाता तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश शिंदे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभुळकर यांनी प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे यांची ही निवड केली आहे.

प्रा ज्ञानेश्वर बनसोडे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक गरीब व हुशार विदयार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून अनेक शालाबाह्य विदयार्थ्यांना स्वखर्चाने शिक्षण प्रवाहात आणून ज्ञानाची गंगा समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे . त्यांच्या या सामाजिक उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना राष्ट्रसंत गाडगेबाबा, वामन दादा कर्डक, सरसेनापती तात्या टोपे, संत रविदास, राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, गुणवंत शिक्षक आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.पिंपरीचिंचवड पुणे महानगरपालिकेने देखील त्यांना स्वछता अभियान पुरस्काराने गौरविले आहे म्हणूनच त्यांची माहिती अधिकार ,पोलिस मित्र व पत्रकार सौरक्षण सेना राहाता तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: