माजी मंत्री पुत्रावर कडक कारवाई करा – स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना निवेदन

माजी मंत्री पुत्रावर कडक कारवाई करा – स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना निवेदन Take stern action against the son of a former minister – Swabhimani’s statement to the Home Minister

पंढरपूर - दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील तांबवे येथिल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकिरण माने यांना त्यांच्या घरी जावून सागर सदाभाऊ खोत यांच्यासह चार इतर साथिदारांनी मारहाण व शिविगाळ केली. राजु शेट्टी सोबत काम करतो हा राग मनात धरून त्यांनी श्री माने यांना धमकावले.

   याविषयी श्री.माने यांनी कासेगाव ता.वाळवा येथील पोलिस ठाण्यात सागर खोत सह अन्य साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली आहे.याबाबत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे व शिवसेना सोलापुर विधानसभा अध्यक्ष सागर तांबोळकर उपस्थित होते.

आरोपी सागर खोत व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी व समाजामध्ये दहशत पसरवु पाहणाऱ्या खोत याच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . याबाबत गृहमंत्र्यांची अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून तातडीने गृहविभागाकडुन कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली असल्याचे बागल यांनी सांगितले.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: