पत्रकाराला अर्वाच्च भाषा व धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस निरीक्षकास तात्काळ निलंबित करा
पत्रकाराला अर्वाच्च भाषा व धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस निरीक्षकास तात्काळ निलंबित करा मागणीचे निवेदन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना Immediate suspension of police inspector
पंढरपूर / नागेश आदापुरे ,11/09/2021 - मुंबईतील लालबाग राजा चे संबंधित वार्तांकन करण्यासाठी आलेले ओळख पत्र आणि विशेष पास बाळगला असतानासुद्धा एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांना वार्तांकनासाठी रोखून ठेवून अर्वाच्य भाषेचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचा पंढरपूर पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तसेच पत्रकारांबरोबर उद्धटपणे वागणाऱ्या पोलीस निरीक्षक संजय निकम यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे अशी मागणीचे निवेदन पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेलेकर यांना देण्यात आले.
आरोग्याची व्यवस्थेचा उडालेला बोजवारा,विविध बातम्यांद्वारे सार्वजनिक करून कोरोना संबंधित उपचार यंत्रणा वेळेत व्यवस्थित करून घेतली ज्यामुळे अनेक कोरोना बाधितांचे प्राण वाचले आहेत तर लॉकडाऊन कालावधीत शासकीय यंत्रणेकडून सर्वसामान्य जनतेचा होणारा छळ जगासमोर आणण्यात पत्रकार आणि वृत्त समूहाचा मोठा वाटा आहे मात्र तरीही पोलीस विभागाकडून मिळणाऱ्या अशा प्रकारच्या अपमानित करणारी वागणूक कुठेतरी प्रसार माध्यमांवर पोलीस बळाचा वापर करून राज्य शासन वृत्तसमूह नियंत्रित करू पाहत आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रेस व पत्रकारांवर होणारे हल्ल्यात विरोधात पूर्वीपासून आक्रमक पवित्रा घेत आहे एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी वार्तांकनापासून रोखताना केलेली धक्काबुक्की व उपस्थित महिला पत्रकाराला वापरलेली अर्वाच्य भाषा निषेधार्थ असल्याचे प्रखर मत महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांना मधून व्यक्त केले जात आहे .
हे निवेदन देताना पत्रकार राजेंद्र कोरके पाटील, प्रवीण नागणे,अपराजित सर्वगोड,विनोद पोतदार, यशवंत कुंभार, रवी कोळी, संतोष रणदिवे, राजेंद्र घाडगे,नागेश आदापुरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.