आधी चीनची नंतर अमेरिकेची अफगाणिस्तानात तालिबान सरकारला आर्थिक मदत

आधी चीनची नंतर अमेरिकेची अफगाणिस्तानात तालिबान सरकारला आर्थिक मदत First China, then the United States, provided financial support to the Taliban government in Afghanistan

वॉशिंग्टन : आधी चीनने अफगाणिस्तानला ३१ दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. यामध्ये अन्नधान्य आणि करोना लशीचाही समावेश आहे. अंतरिम सरकारकडून अफगाणिस्तानमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी ही मदत आवश्यक असल्याचे चीनने म्हटले होते.त्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अंतरिम सरकार स्थापन केल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी ६४ दशलक्ष डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे.टोलो न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र् संघात अमेरिकेचे राजदूत लिंडा थॉम्पसन-ग्रीनफिल्ड यांनी ही आर्थिक मदत मानवीय दृष्टीकोणातून देणार असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे. अशा स्थितीत अमेरिकेकडून मानवतेच्या दृष्टीने ही ६४ दशलक्ष डॉलरची मदत देण्यात येणार आहे.अफगाणिस्तानमधील परिस्थिती लक्षात घेता भविष्यात आणखी मदत देण्यावरही विचार केला जाऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बायडन म्हणाले,तालिबान आणि त्याच्या तीन मित्रांच्या वाटचालीवर आमचंही लक्ष

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघारीची घोषणा केल्यानंतर चीनने तालिबानशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे.दुसरीकडे तालिबानलाही मोठ्या देशाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. तालिबानी शिष्टमंडळाने चीनमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतही चर्चा केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: