आत्महत्या रोखणाऱ्या महिला पोलीस पात्रे यांचा पत्रकार सुरक्षा समितीवतीने सन्मान

आत्महत्या रोखणाऱ्या महिला पोलीस पात्रे यांचा पत्रकार सुरक्षा समितीवतीने सन्मान
Patrakar suraksha samiti honors female police personnel who prevented suicide

सोलापूर / प्रतिनिधी : शहरातील संभाजी तलाव येथे एक महिला अतिशय वाईट व बिकट परिस्थिती असल्याने आपल्या गरीब परिस्थितीला कंटाळून दोन मुलांचे पालन पोषण करण्यास हाती पैसा नसल्याने निराश व हताश होऊन आत्महत्या करण्यासाठी संभाजी तलाव येथे आली.आता तिचे दोन मुले ओरडत व रडत असताना त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस पात्रे यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ बांबूवरून उडी मारून त्या महिलेला पकडले असून त्या गरीब महिलेचा जीव वाचवून आत्महत्या रोखली आहे. या कार्याची पत्रकार सुरक्षा समितीने दखल घेऊन महिला पोलीस कर्मचारी पात्रे यांना दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार,जिल्हा कार्याध्यक्ष शब्बीर मणियार, शहराध्यक्ष वैजिनाथ बिराजदार ,कार्याध्यक्ष अन्सार तांबोळी (बी एस), संपर्क प्रमुख लक्ष्मण गणपा, सचिव अभिषेक चिलका, अक्षय बबलाद ,इस्माईल शेख, श्रीनिवास गोरला, नागनाथ गणपा, शिवानंद जेऊरे, सूर्यकांत व्हणकडे, संतोष खलाटे, सिद्धार्थ भडकुंभे, प्रदीप पेदापल्लीवार ,राम हुंडारे, विजयकुमार चव्हाण, रिझवान शेख,अनिरुद्ध गायकवाड,रोहित घोडके, शिवराज मुगळे ,अकबर शेख, इम्तियाज अक्कलकोटकर, रॉयल संस्था चे सादिक नदाफ, सह पोलीस कर्मचारी देशमुख, तांबोळी, फडके, मुटकुळे आदी उपस्थित होते.
दैनिक तुफान क्रांतीवतीने विशेष सन्मान

महिला पोलीस कर्मचारी पात्रे यांच्या धाडसी कामगिरीची दैनिक तुफानक्रांती ने दखल घेऊन त्यांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन विशेष गौरव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: