या निर्णयाविरोधात स्वाभिमानीचा लढा,फक्त एक मिस कॉल देवून साथ द्या – तानाजी बागल
FRP च्या तीन तुकडीकरणाच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानीचा लढा,फक्त एक मिस कॉल देवून लढाईला साथ द्यावी – तानाजी बागल
पंढरपूर - ऊसाच्या FRP चे तीन तुकडे करण्याचा कट साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आडून केला आहे. यामुळे भविष्यात शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याविरोधात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार आहे,याचीच सुरूवात म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून एक अनोखी मोहीम राज्यभर राबविली जात असुन त्यानुसार ऊस उत्पादकांची १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ मिस्डकॉल मोहिम राबवण्यात येत आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक संपर्क क्रमांक देखील जाहीर केला आहे .या मोहिमेस आपल्या सोलापूर जिल्ह्यात देखील चांगल प्रतिसाद मिळतो आहे . तरी शेतकरी बांधवांनी या लढाईस आणखी पाठबळ देण्यासाठी (8448 183 751) या क्रमांकावर मिस्डकॉल द्यावा व या लढाईत सामिल व्हावे असे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापुर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी केले आहे . या मिस्डकॉल मोहिमेतून मिळालेला डेटा सुप्रीम कोर्टात या व्यापक कटा विरोधात वापरण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बागल यांनी केले आहे .

सोलापूर हा ऊस उत्पादनाचा केंद्रबिंदू आहे सोलापुर हे साखरेचे कोठार मानले जाते . या तुकडीकरणामुळे शेतकर्यांना भविष्यात मोठा फटका बसणार आहे . 60% रक्कम ऊस तुटल्यानंतर 15 दिवस ते 1 महिन्यात , 20% रक्कम गळीत हंगाम संपल्यावर व उर्वरती 20% रक्कम पुढील गळीत हंगाम सुरू झाल्यावर शेतकर्यांना बिल मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एक रक्कमी FRP चे कायदेशीर कवचच शासन काढून घेत आहे. आज आपण शेतकरी म्हणून लढलो नाही तर भविष्य ऊस उत्पादकांचे ही अंधारात आहे, ऊस हे एकमेव भरवशाचे हमीभावाचे पीक आहे जर FRP चे तुकडे झाले तर ऊस शेती सुद्धा परवडणार नाही म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जागृत व्हावे व संघटित होवुन संघर्षास तयार रहावे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल