कांदिवली पोलीस ठाण्याने यशस्वी कामगिरी करत एकूण किंमत 10,17,100/- ची मालमत्ता परत मिळवून तक्रारदारांना परत केली

कांदिवली पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी

जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : कांदिवली पोलीस ठाणे मोबाईल गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम,पो.शि.क्र  130315/ परमेश्वर चव्हाण,म.पो.ना.क्र. 061945/ अंजना यादव यांनी कांदिवली पोलीस ठाणे नोंदमध्ये हरवलेल्या मोबाईलचा CEIR या पोर्टलच्या आधारे प्राप्त माहितीच्या आधारे निरंतर पाठपुरावा करून सदर मोबाईलचे वापरकर्ता यांचा शोध घेऊन मुंबई तसेच गुजरात, उत्तर प्रदेश,झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल या परराज्यातून एकूण 54 मोबाईल एकूण किंमत 10,17,100/- ची मालमत्ता परत मिळवून तक्रारदारांना परत करण्यात आलेली आहे.

 सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 11 चे सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे, कांदिवली पोलीस ठाणे, आनंद कांबळे पोलीस निरीक्षक(गुन्हे) यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम व पथकाने पार पाडली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *