एक सूचना सावधगिरीची-ॲड.चैतन्य भंडारी
धुळे/ज्ञानप्रवाह न्यूज – सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी म्हणाले की,मी आजवरच्या अनुभवातून सांगतो तुम्हाला गोड गोड बोलून आणि तुम्ही किती छान दिसता असं सांगत एआय च्या मदतीने अफाट सुंदर तुम्हाला तुमचा फोटो पाहायला मिळतोय आणि तुम्हीही तो कौतुकाने सोशल मीडिया वर टाकताय.पण असं ते लोक तुमच्यासाठी इतकी का मेहनत घेतायत ? का त्यांचे अँप फ्री मध्ये तुम्हाला देतात ? याचा कधी विचार केलाय का ?
तुम्ही ते अँप डाउनलोड करून अथवा ऑनलाईन ते वापरून तुमच्या फोटोचे मोहक रूप ट्रान्स्फर करून घेण्यापूर्वी त्यांनी तुम्हाला काही परमिशन्स मागितलेल्या असतात आणि तुम्ही पण ओके ओके करत जाता आणि तुमची फोटो गॅलरी त्यांच्या ताब्यात देता.तुमच्या फोनचा ऍक्सेस त्यांच्याकडे जाऊ शकतो.मग पुढंमागे त्याचा मिसयुज केला गेला तर तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का ? खरा धोका तो आहे.या गोष्टी आता समोर येत आहेत.
शिवाय पुढमागे त्यांच्याकडून त्यांच्या क्लाएन्टच्या विविध जाहिराती तुम्हाला दिसू लागल्या तर तुम्हाला त्या पाहाव्या लागणार आहेत. त्यात तुमचा मोबाईल डेटा वापरला जाणार शिवाय वेळही जाणार आणि जर टाइम इज मनी हे सत्य असेल तर तुम्ही नकळतपणे तुमचा पैसाच वाया घालवताय असं मान्य करावं लागेल.हे सगळं वेळीच ओळखा आणि प्रायव्हसी जपा.जगात मोफत कुणी काहीच कुणासाठी करत नसत.त्यामागे काहीतरी छुपा हेतू असतोच हे विसरू नका असे आवाहन सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी व डॉ.धनंजय देशपांडे,पुणे यांनी केले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------