सोलापूरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त

सोलापूर शहरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त

सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०३/२०२४ –सोलापूर शहरात गांजा या अंमली पदार्थांचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोसई अल्फाज शेख यांना दि.२६/०३/२०२४ रोजी गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,अजित सुखदेव जगताप, सध्या स्वराज विहार, सोलापूर येथे राहत असुन तो तेथील घरातुन तसेच त्याचे मुळ गाव- मु.पो.सोहाळे,ता.मोहोळ जि. सोलापूर येथील घरातुन गांजा विक्रीचा धंदा करीत आहे.सध्या त्याचे दोन्ही घरामध्ये गांजाचा साठा आहे अशी बातमी प्राप्त झाल्यानंतर एन.डी.पी.एस.कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सोलापूर शहर यांचे आदेशाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि संजय क्षिरसागर, पोसई अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी अजित सुखदेव जगताप याचे स्वराज विहार, सोलापूर येथील राहते घराची तसेच त्याचे मु.पो.सोहाळे,ता.मोहोळ,जि.सोलापूर येथील राहते घराची झडती घेतली असता त्याचे दोन्ही घरांमध्ये १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा एकुण ७७.५२१ किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा मिळुन आल्याने सदरचा गांजा जप्त करुन, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १८६/२०२४ एन. डी. पी. एस.ॲक्ट कलम ८(क), २०(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित सुखदेव जगताप यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यास न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि संजय क्षिरसागर गुन्हे शाखा सोलापूर शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम.राज कुमार सोलापूर शहर, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे डॉ.दीपाली काळे,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनिल दोरगे सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि संजय क्षिरसागर,पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख,पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे,सैपन सय्यद, महेश शिंदे,राजु मुदगल, कुमार शेळके, अनिल जाधव, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, वसिम शेख, महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *