मराठी जैन साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.रावसाहेब पाटील यांचा सन्मान
मराठी जैन साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.रावसाहेब पाटील यांचा सन्मान Honor of Dr. Raosaheb Patil, Planned President of Marathi Jain Sahitya Sammelan

सोलापूर - सोलापूर आर्यनंदीनगर येथील श्रावकरत्न नंदकुमार कंगळे यांच्या निवासस्थानी २५ व्या मराठी जैन साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.रावसाहेब पाटील यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ.रावसाहेब पाटील यांनी प्राचीन मराठी भाषेतील जैन साहित्याचे संरक्षण आणि संशोधनासाठी नव्या अभ्यासकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

पर्युषण पर्वनिमित्त आयोजित या कौटुंबिक कार्यक्रमात प्रा.आनंद महाजन यांना गणित विषयात Phd.मिळाल्याबद्दल कंगळे परिवारातर्फे डॉ.रावसाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रा.महाजन, प्रा.संजय बंदोडकर यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास सौ.माणिक रावसाहेब पाटील,सौ.सुरेखा नंदकुमार कंगळे, शांतीनाथ समर्थ ,आनंद कंगळे,सौ.मयुरी आनंद कंगळे,सौ.वैशाली वीरेंद्र समर्थ,सौ.महाजन तथा कंगळे परिवार उपस्थित होता. श्री नंदकुमार कंगळे यांनी आभार मानले.या कार्यक्रमापूर्वी पंचपरमेष्टीची आरती झाली.