भोर येथे घोरपड रेस्कु ऑपरेशन

भोर येथे घोरपड रेस्कु ऑपरेशन

भोर /ज्ञानप्रवाह न्यूज –भोर येथील व्यापारी अमय म्हसवडे यांचा फोन आला की दादा आमच्या दुकानांत घोरपड सदृश्य प्राणी आला आहे.त्यांनी लगेच दिपक दत्तात्रय घोरपडे यांना फोटो काढून पाठवले ते पाहून ही घोरपड आहे असे लक्षात आले.

त्यानंतर घोरपडी संदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती देताना सांगितले की हा प्राणी विषारी नाही .तुम्हाला शक्य असल्यास हवा खेळती राहील अशा एखाद्या बरणी किंवा बॉक्स मधे याला रेस्कु करा परंतु त्या प्राण्याला मारु नका.कारण सदर प्राणी 1972 च्या कायद्या नुसार संवर्धीत जीव आहे .या प्राण्याची हत्या करणे कायदेशीर गुन्हा आहे.

अमय म्हसवडे यांनी मोठ्या शिताफीने घोरपडीला एका हवा खेळती राहील अशा पध्दतीने बरणीत बंदिस्त केले.अमय म्हसवडे यांनी भोर वनविभागात कार्यरत असलेले गणेश मानकर यांना फोन करून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी लगेच वनविभागातील त्यांचे सहकारी शिवकुमार होनराव यांना फोन करून संबंधित घोरपड रेस्कु करण्यासाठी घटनास्थळी पाठवले.

शिवकुमार होनराव सर हे फक्त पंधरा मिनिटांत घटनास्थळी पोचले.दुकानाचे मालक आनंद म्हसवडे यांनी स्वहस्ते घोरपड लगेच वनविभागाचे अधिकारी शिवकुमार होनराव सर यांचेकडे सुपुर्द केली.

भोर प्रादेशिक वनविभागाचे सहा.वनसंरक्षक श्रीमती शितल राठोड यांच्या मार्गदर्शनात वनपाल श्री.खट्टे,श्री.गुट्टे व श्री. होनराव यांनी थोड्या वेळातच सदर घोरपड सुरक्षित स्थळी नेऊन सोडून दिली.यासाठी त्या वनविभागाच्या सर्व कर्मचार्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल अमय म्हसवडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

आई पार्वतीचे वाहन असलेल्या व जिच्या मुळे इतिहासात आम्हाला घोरपडे आडनाव मिळाले अशा घोरपडीस वाचवण्यात आज यश आले याचा खुप आनंद झाला.या रेस्कु ऑपरेशन मध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वाचे मनःपूर्वक धन्यवाद – दिपक दत्तात्रय घोरपडे

Leave a Reply

Back To Top