सोलापुरात ११ मार्चला हिंदू राष्ट्र-जागृती सभा: धर्म,संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी मोठे आयोजन

सोलापुरात ११ मार्चला हिंदू राष्ट्र-जागृती सभा: धर्म,संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी मोठे आयोजन

सोलापूरमध्ये ११ मार्चला हिंदू राष्ट्र-जागृती सभा: हजारो नागरिकांच्या उपस्थितीची शक्यता

Solapur news: सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज : हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरेविषयी जनजागृती करण्यासाठी हिंदू जनजागृती समिती Hindu Janajagruti Samiti च्या वतीने सोलापूरमध्ये ‘हिंदू राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्यात आली आहे. ही सभा बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भवानी पेठेतील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती समितीचे पदाधिकारी राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला Sanatan Sanstha चे हिरालाल तिवारी, संत तुकाराम बाबा जोशी मठाचे मठाधीश ह.भ.प. धर्मनाथ महाराज जोशी, माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, आजोबा गणपती मंडळाचे विश्वस्त योगीनाथ फुलारी आणि प्रज्ञापुरी ज्ञानपीठ ट्रस्टचे पिठासीन धर्माधिकारी प्रसाद पंडित उपस्थित होते.
सभेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा, सनातनच्या सद्गुरू स्वाती खाडये तसेच हिंदू जनजागृती समितीचे संघटक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर शहरासह आसपासच्या ७४ गावांमध्ये सभेच्या निमित्ताने व्यापक जनजागृती करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष बैठका, घरोघरी संपर्क, फलक लेखन, होर्डिंग्ज, हस्तपत्रके, भित्तीपत्रके, मेगाफोनद्वारे उद्घोषणा, प्रसार फेरी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सुमारे १ लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत सभेचे निमंत्रण पोहोचवण्यात आले आहे.

सभेच्या प्रसारासाठी महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत १६ हजारांहून अधिक नागरिकांना घरभेटीद्वारे निमंत्रण दिले. तसेच २०० हून अधिक बैठका, प्रसार फेऱ्या आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सभेचा संदेश शहर व ग्रामीण भागात पोहोचवण्यात आला आहे. त्यामुळे या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Back To Top