मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच दिवशी 1584 नागरिकांना विविध योजनांचा लाभ

Mangalwedha मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच दिवशी 1,584 नागरिकांना विविध योजनांचा लाभ

मंगळवेढ्यात महसूल समाधान शिबिरात 1,584 नागरिकांना लाभ; एका छताखाली 23 विभागांची सेवा

Mangalwedha news : मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज : तहसील कार्यालय मंगळवेढा यांच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या शिबिरात एकाच दिवशी तब्बल 1,584 नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

शिबिराचे उद्घाटन तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बी. आर. माळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, करुणा क्षीरसागर, संगीता दुधाळ, रमेश भांजे तसेच पंचायत समिती सदस्य विनायक यादव, दीपाली ताड, जयश्री कवचाळे, मोहिनी गणपाटील, आप्पासो निकम, सुरेश कांबळे, अर्जुन मल्लाळे आणि जयश्री शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मदन जाधव यांनी केले.आभार प्रदर्शन नायब तहसीलदार शीतल कन्हेरे यांनी केले.यावेळी तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ,उपअधीक्षक भूमी अभिलेख विद्या तांगडे तसेच पंचायत समिती, वनविभाग आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या शिबिरात महसूल विभागासह विविध विभागांचे एकूण 23 स्टॉल उभारण्यात आले होते. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील सर्व शाखांमधील अधिकारी-कर्मचारी यांनी एकाच छताखाली नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्या.

विविध महसूल सेवांचा लाभ

या शिबिरात महसूल विभागामार्फत अनेक महत्त्वाच्या सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. त्यामध्ये
206 फेरफार प्रकरणे निकाली
7/12 दुरुस्तीसाठी 12 अर्ज स्वीकार
327 डिजिटल 7/12 उपलब्ध
568 प्रमाणपत्रांचे वितरण
एक खिडकी व्यवस्थेत 19 अर्ज निकाली
भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणांत गावदप्तर अद्ययावत
तसेच घरकुल लाभार्थ्यांना 540 ब्रास वाळूचे मोफत वाटप करण्यात आले.

विविध विभागांकडून योजनांचा लाभ

शिबिरात इतर विभागांच्या माध्यमातूनही नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आला.
संजय गांधी योजना – 111 लाभार्थी
पुरवठा विभाग – 61 लाभार्थी
अभिलेख शाखा – 10 शेतकुंडली वाटप
44 उत्पन्न दाखले (₹21,000)
13 जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे
4 लाभार्थ्यांना घरकुलासाठी शासकीय जागा
10 मतदान ओळखपत्रे
12 ऍग्रीस्टॅक नोंदणी
12 लाभार्थ्यांची 7/12 दुरुस्ती
सेतू व महा ई-सेवा केंद्रामार्फत 63 उत्पन्न प्रमाणपत्रे व 13 अधिवास प्रमाणपत्रे देण्यात आली.

पंचायत समितीमार्फत 12 लाभार्थ्यांना ई-मोशन बाईक, ई-रिक्षा, शेळी गट, पिठाची गिरणी आणि झेरॉक्स मशीनचे वाटप करण्यात आले. कृषी विभागामार्फत 8 लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली, तर वन विभागानेही शेतकऱ्यांना आर्थिक लाभाचे धनादेश वितरित केले.

पुढील शिबिरांचे वेळापत्रक

मंगळवेढा तालुक्यात एकूण सहा महसूल समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. पुढील शिबिरे
14 मार्च – आंधळगाव
10 एप्रिल – पाटखळ
17 एप्रिल – मरवडे
8 मे – भोसे
15 मे – नगर परिषद हद्द
या ठिकाणी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
विशेष आकर्षण
शिबिरात तयार करण्यात आलेले सेल्फी पॉईंट नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

तहसील कार्यालय मंगळवेढा आयोजित शेत कुंडली हा राज्यातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला.
तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दोन लाभार्थ्यांना विशेष लाभ देण्यात आला.

Leave a Reply

Back To Top