पंढरपूर मंदिरात ५ लाखांच्या सोन्याच्या तुळशीहाराची अर्पण; देणगीदारांचा मंदिर समितीकडून सन्मान

श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी सुवर्ण तुळशीहार अर्पण; मोहोळच्या भाविकांची भक्तीपूर्ण देणगी

श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी सुवर्ण तुळशीहार अर्पण; भाविकांची भक्तीपूर्ण देणगी

पंढरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.४ जून २०२६ : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तीभावाचे आणखी एक सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील भाविका श्रीमती गोदाबाई गणपत गोगरे यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी सुवर्ण तुळशीपानांचा आकर्षक हार अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.

मंदिर समितीच्या माहितीनुसार, दिनांक ४ जून रोजी अर्पण करण्यात आलेल्या या सुवर्ण हारामध्ये ३२ तुळशीपाने आणि ६४ गोल मणी असून हाराचे एकूण वजन ३५ ग्रॅम आहे. या हाराची अंदाजित किंमत ₹५ लाख ८५० इतकी आहे.

भाविकांच्या श्रद्धा आणि भक्तीमुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे वैभव अधिक वृद्धिंगत होत असून अशा देणग्यांमधून भक्तांचा देवावरील अढळ विश्वास दिसून येतो.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने देणगीदार भाविकांचा सत्कार करण्यात आला. मंदिर समिती सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर) यांच्या हस्ते श्रीमती गोदाबाई गोगरे यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Back To Top