IPO गुंतवणूक; ‘इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया’चा ५०० कोटींचा आयपीओ
हायलाइट्स:
- इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडने सेबीकडे ५०० कोटी उभारण्यासाठी समभाग विक्रीचा प्रस्ताव सादर केला
- ‘ईएमआयएल’कडे ६००० हून अधिक स्ट्रॉक किपिंग युनिट (एसकेयु) आहे.
- आर्थिक वर्ष २१ दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न ३२०७.३७ कोटी
पुढील महिन्यात २० दिवस बँंकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँंका राहणार बंद, जाणून घ्या
या व्यवहारातून मिळणाऱ्या रकमेचा विनियोग भांडवली खर्च आणि खेळत्या भांडवलाच्या वाढत्या गरजा अनुक्रमे १३३.८ कोटी आणि २०० कोटीपर्यंत करण्यात येणार आहे. त्याशिवाय सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांव्यतिरिक्त ५० कोटींचा परतावा/पूर्वभरणा करण्यात येईल. तीन दशकांहून अधिक कालावधीची परंपरा असलेल्या ‘ईएमआयएल’ची स्थापना पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी मालकी उद्देशातून करत ‘मेसर्स बजाज इलेक्ट्रॉनिक्स’ नावाखाली ग्राहकोपयोगी उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या विक्रीला सुरुवात केली.
वित्तीय सेवा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी; ‘आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी’चा आयपीओ जाहीर
आज ही कंपनी भारतात चौथ्या क्रमांकावर असून १ कोटींहून अधिक ग्राहकांसह, आपल्या २६०० व्यावसायिक कर्मचारी बळाच्या मजबूत पाठिंब्यावर ९०हून अधिक दालनांमार्फत ७५०००० चौ.फू. विक्री जागेत अस्तित्व राखून आहे. याची मल्टी-ब्रँड दालने बजाज इलेक्ट्रॉनिक्स या ब्रँड नावाखाली कार्यान्वित आहेत. तसेच अन्य दोन दालने किचन स्टोरीज नावाखाली सुरू आहेत.
बँंक ग्राहकांनो इकडे लक्ष द्या! १ ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार
‘ईएमआयएल’कडे ६००० हून अधिक स्ट्रॉक किपिंग युनिट (एसकेयु) असून याद्वारे वातानुकूलित यंत्रे, टेलीव्हिजन, धुलाई यंत्रे, रेफ्रिजरेटर; मोबाईल आणि छोट्या उपकरणांशिवाय अन्य आयटी उत्पादनांसह ७० हून अधिक ग्राहकोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक ब्रँड उपलब्ध करून देण्यात येतात. याद्वारे होलसेल आणि ईकॉमर्स चॅनल चालवण्यात येतात.
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी; आता घरबसल्या जमा करा वार्षिक जीवन प्रमाणपत्र
आर्थिक वर्ष २१ दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न ३२०७.३७ कोटी असून वर्षभरापूर्वी ३१७९.०२ कोटी याप्रमाणे होते. या कालावधीसाठी एकंदर नफा ५८.६२ कोटींचा राहिला तर मागील वर्षी तो ८१.६१ कोटी होता. महासाथीमुळे ग्राहकांनी खरेदी न केल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल. मसुद्याच्या दस्तऐवजात नमूद क्रिसिल अहवालानुसार, आर्थिक वर्ष १५-२० या कालावधीत महसूल २५.६० टक्के जीएजीआर वाढला आणि आर्थिक वर्ष २० दरम्यान अन्य प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत ईबीआयटीए मार्जिन सर्वाधिक राहिले.