pm modi returns from us visit : PM मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतले; भाजप नेत्यांनी केले जंगी स्वागत


नवी दिल्लीः अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी भारतात परतले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर भाजप कार्यकर्त्यांनी दिल्ली विमानतळावर पंतप्रधानांचे जंगी स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेत सलग २० बैठका

पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौऱ्यात सलग अनेक बैठका घेतल्या. पंतप्रधान मोदी हे जवळपास ६५ तास अमेरिकेत होते आणि यादरम्यान त्यांनी २० बैठकांमध्ये उपस्थिती लावली. तसंच अमेरिकेला जाताना आणि परतताना पंतप्रधान मोदींनी विमानतही अधिकाऱ्यांसोबत ४ मोठ्या बैठका घेतल्या. अमेरिकेले जाताना दोन बैठका आणि तिथे पोहोचल्यानंतर तीन बैठका घेतल्या, अशी माहिती रविवारी सूत्रांनी दिली.

दिल्ली विमानतळावर पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत

राजधानी दिल्लीत पंतप्रधानांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा आणि क्वाड परिषदेत सहभागी झाल्यावर पंतप्रधान मोदी मायदेशात परतल्यानंतर भाजप अध्यक्षांनी त्यांचे अभिनंदन केले.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची मैत्री नवीन नाही. त्यांचे मैत्री जुनी आहे. पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा हा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताकडे जग वेगळ्या दृष्टीने पाहतं आहे. कोट्यवधी भारतीयांच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो, असं नड्डा म्हणाले.


पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली कृज्ञता

‘भारत माता की जय’ अशी घोषणा देत पंतप्रधान मोदींनी संबोधनाला सुरवात केली. त्यांनी सर्वांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी संबोधित केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोदी…मोदी… अशा घोषणा दिल्या.

uddhav thackeray amit shah :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक

पंतप्रधान मोदींच्या स्वगतासाठी दिल्ली विमानतळाबाहेर तयारी केली गेली होती. दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता, दिल्लीचे ७ खासदार, भाजपशासित ३ महापालिकांचे महापौर, एनडीएमसीचे सदस्य आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारीही मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: