केकेआरला मोठा धक्का; महत्वाच्या खेळाडूने आयपीएल सोडली, भारतामध्ये झाला दाखल…नवी दिल्ली : आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाला आता मोठा धक्का बसला आहे. कारण केकेआरच्या महत्वाच्या खेळाडूने आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला असून तो आता भारतात परतला आहे.
आयपीएल आता ऐन रंगात आली असताना केकेआरचा महत्वाचा खेळाडू आता ही स्पर्धा खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण सराव करत असताना केकेआरचा महत्वाचा खेळाडू कुलदीप यादवला गंभीर दुखापत झाली आहे. ही दुखापत एवढ्या गंभीर स्वरुपाची आहे की, त्याच्यावर आता शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. शस्त्रक्रीया करण्यासाठी कुलदीपला आयपीएल सोडवे लागले असून तो मुंबईत दाखल झाला आहे. या दुखापतीमधून सावरण्यासाठी कुलदीपला आता बराच मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे कुलदीप आता रणजी स्पर्धाही यावर्षी खेळू शकणार नाही. त्यामुळे आता कुलदीप मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटमधून लांब राहणार असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कुलदीप हा चांगल्या फॉर्मात नव्हता, त्याचबरोबर आयपीएलमध्ये केकेआर त्याला संधीही देत नसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे कुलदीपसाठी हा फारच कठीण काळ होता. त्यामध्येच कुलदीपला सराव करताना आता मोठी दुखापत झाली आहे आणि तो आता बरेच महिने क्रिकेटपासून लांब राहणार आहे. त्यामुळे कुलदीपच्या कारकिर्दीचे आता काय होणार, हा प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडला असेल.

गेल्या काही सामन्यांमध्ये केकेआरची कामगिरी चांगली होत आहे. पण आता त्यांना कुलदीपच्या रुपात हा एक मोठा धक्का बसला आहे. केकेआरला आता कुलदीपच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचे, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण आता ही संपूर्ण आयपीएल कुलदीप यादव खेळणार नाही, त्यामुळे आता त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात घ्यायचे, याचा विचार केकेआरच्या संघ व्यवस्थापनाला करावा लागणार आहे. पण केकेआरला आता नवीन खेळाडू निवडायचा असेल तर तो संघात कसा दाखल होईल, याचा विचारही त्यांना करावा लागणार आहे. कारण सध्याच्या घडीला करोनामुळे नियम बदलण्यात आले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: