चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून केला खून


हायलाइट्स:

  • चारित्र्यावर संशय घेऊन सतत वाद
  • पतीचा पत्नीने केला दगडाने ठेचून खून
  • सांगलीतील घटनेनं सर्वत्र खळबळ

सांगली : चारित्र्यावर संशय घेऊन सतत वाद घालणाऱ्या पतीचा पत्नीने दगडाने ठेचून आणि चाकूने भोसकून खून केला. ही घटना गोमेवाडी (ता. आटपाडी) येथे बुधवारी दुपारी घडली.

श्रीकांत श्रीपती खरात (वय ४४) असं मृत पतीचं नाव आहे. तर याप्रकरणी पत्नी वैशाली श्रीकांत खरात (वय ३८) हिला आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.

शाळेतील मुलीसोबत चित्रकला शिक्षकाचं संतापजनक कृत्य; कोर्टाने दिला दणका

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीकांत खरात आणि वैशाली खरात हे दाम्पत्य गोमेवाडी येथे राहत होते. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून या दोघांमध्ये सतत वाद होत होते. याच मुद्द्यावरून बुधवारी दुपारी दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. त्यावेळी पती चाकू घेऊन पत्नीच्या अंगावर धावला. त्याने पत्नी वैशाली हिच्या पायावर चाकूने वार केले. यात पत्नी जखमी झाली.

संतापलेल्या पत्नीने पतीच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. त्याच चाकूने पतीच्या गळ्यावर वार केले. यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला.

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विटा उपविभागीय उपअधीक्षक पद्मा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी वैशाली खरात हिला अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि दगड ताब्यात घेतले आहेत. आटपाडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: