Video : जिंकलस भावा! रोहित शर्माने पंजाविरुद्धच्या सामन्यात फक्त एक गोष्ट करत जिंकली सर्वांची मनं…


अबु धाबी : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात एक अशी गोष्ट केली की, त्याने सर्वांचीच मनं जिंकून घेतली. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज (MI vs PBKS) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान खिलाडूवृत्तीचं एक उत्तम उदाहरण दिसून आलं.मुंबईच्या संघानं के.एल. राहुलविरुद्ध धावबाद झाल्याचं आवाहन केलं होतं, जे कर्णधार रोहित शर्मानं काही वेळातच मागे घेतलं. पंजाबच्या डावाच्या सहाव्या षटकात राहुल नॉन स्ट्राईकवर होता, तर स्फोटक फलंदाज ख्रिस गेल स्ट्राईकवर होता. कृणाल पंड्याचा एक चेंडू गेलने सरळ मारला, जो राहुलच्या हाताला लागला आणि कृणालच्या दिशेने गेला. राहुल चेंडू लागल्यानंतर धाव घेण्यासाठी क्रीजच्या बाहेर पडला आणि पुन्हा त्याने क्रीजमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान कृणालने चेंडू स्टंपवर मारत राहुलला धावबाद करत पंचांकडे अपील केलं.

मुंबईच्या संघानं गमावला असता रिव्ह्यूरोहितनं राहुलविरुद्धची ही अपील मागे घेत असल्याचं आधीच पंचांना सूचित केलं होतं. रोहितच्या या खिलाडूवृत्तीनं अनेक क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली आहेत. हा निकाल खूपच अवघड लागला असता. अशा स्थितीत मुंबईचा संघ त्यांचा एक रिव्ह्यूही गमावू शकला असता. कृणालनेही रिव्ह्यू मागे घेत असल्याचे पंचांना सांगितले. राहुलनेही रोहितच्या या निर्णयाचं कौतुक करत त्याला अंगठा दाखवत अभिवादन केलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. गेल्या तीन सामन्यांमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या मुंबईच्या संघाने अबू धाबीत पराभवाची मालिका खंडित केली. १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने ६ चेंडू शिल्लक राखत लक्ष्य साध्य केलं. या विजयासह मुंबई इंडियन्सने दोन गुणांची कमाई केली. या दोन गुणांस गुणतालिकेत मोठा बदल झालेला पाहायला मिळाला. कारण मुंबई इंडियन्सचा संघ जो सातव्या स्थानावर होता, त्याने पाचवे स्थान पटकावले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: