पंढरपूर शहर शिवसेनेच्यावतीने मतदार नोंदणी अभियान

पंढरपूर शहर शिवसेनेच्यावतीने मतदार नोंदणी अभियान Voter Registration Campaign on behalf of Pandharpur City Shiv Sena

पंढरपूर ,29/09/2021 – पंढरपूर शहरात डिसेंबर महिन्यात येवू घातलेल्या नगरपरिषद निवडणुका पुर्वी नवीन मतदार नाव नोंदणी अभियान पंढरपूर शहर शिवसेनेच्यावतीने सुरू करण्यात आले आहे.

  या अभियानाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, शिवसेना शहर प्रमुख रविंद्र मुळे यांच्या हस्ते तथा शिवसेना नेते जयवंत माने, सिद्धनाथ कोरे, शिवसेना उपशहर प्रमुख पोपट सावतराव,लंकेश बुराडे,विनय वनारे, अविनाश वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.

    यावेळी विभाग प्रमुख मनोज शिंदे,विक्रम अभंगराव, अनिल केंगार तसेच अन्य शिवसैनिक तथा नूतन मतदार नोंदणी करण्यासाठी नवयुवक उपस्थित होते. हे अभियान शिवसेना पंढरपूर उपशहर प्रमुख तानाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे.

पंढरपूर शहर प्रमुख रविंद्र मुळे यांनी पंढरपूर नगरपरिषद परिसरातील नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी आपले ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला ही नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे दाखवून जास्तीत जास्त युवकांनी व युवतींनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे. कारण मतदान हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे, ज्यामुळे आपण देशाचे नेतृत्वही निवडू शकतो.

आजपासून सुरू झालेल्या या मतदार नोंदणीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: