रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी; युवराज संभाजी छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी; ५ व ६ जून रोजी भव्य कार्यक्रमांचे आयोजन

युवराज संभाजी छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर शिवराज्याभिषेक महोत्सव; हजारो शिवभक्तांची उपस्थिती अपेक्षित

Pandhapur news : पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज- अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महादेव तळेकर यांनी दिली.

दुर्गराज रायगड किल्ल्यावर दिनांक पाच व सहा जून रोजी प्रतिवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक करण्यात आला होता. या ऐतिहासिक क्षणाची स्मृती सदैव राहावी या हेतूने दरवर्षी दुर्गराज रायगड वर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यामध्ये यंदा शुक्रवार पाच जून रोजी प्रथम राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस अभिवादन, दुपारी चार वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत करून हजारो शिवभक्तांच्या समवेत गड चढण्यास प्रारंभ, यानंतर गड पूजन तसेच धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची या युद्ध कलेच्या प्रात्यक्षिकास प्रारंभ, सायंकाळी सात वाजता ढोल वादन, लेझीम प्रात्यक्षिक व वारकरी संप्रदायाकडून टाळ मृदुंगाचा गजर, रात्री आठ वाजता जागर शिवशाहीरांचा, रात्री नऊ वाजता गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, यानंतर वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन होणार आहे.

दिनांक 6 जून शिवराज्याभिषेक दिवशी सकाळी सात वाजता युवराजकुमार शहाजीराजे यांचे हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण, सकाळी साडेसात वाजता शाहिरी कार्यक्रम, साडेनऊ वाजता शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राज्यसभेवर आगमन, सकाळी दहा वाजता युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते शिवछत्रपती महाराजांच्या उत्सव मूर्तीस अभिषेक तसेच राजदरबार वरील सिंहासनावरील मूर्तीस सुवर्णमुद्रांचा अभिषेक, त्यानंतर युवराज संभाजी महाराज उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा या कार्यक्रमास प्रारंभ तर दुपारी साडेबारा वाजता शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमास पंढरपूर शहर व तालुक्यातून हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव तळेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top