‘पालकमंत्री पूरग्रस्त जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला गेले’, पंकजांचा धनंजय मुंडेंवर थेट निशाणा
मुसळधार पावसाचा फटका बसल्यामुळे परळी तालुक्यात पंकजा मुंडे यांनी भरपावसात दौरा केला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आणि ग्रामस्थ शेतकऱ्यांना धीर दिला. या दौऱ्या वेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. पालकमंत्री पूरग्रस्त जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला गेले आहेत असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका केली.