किरेन रिजिजूंचा डान्स, PM मोदींनी फिरकी घेतली…!


नवी दिल्लीः केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू हे बुधवारी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यांनी अरुणाचलमधील प्रकल्पाचा आढावा घेतला. यादरम्याने ते गावकऱ्यांसोबत लोकगीतावर थिरकलेही. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्थानिक सेजलांग गावकरी ज्यांना ईशान्य राज्यातील काजलांग गावात मिजी नावाने ओळखलं जातं. या गावकऱ्यांनी पारंपरिक गाणी आणि नृत्याने केंद्रीय मंत्री रिजिजू यांचे जोरदार स्वागत केले.

किरेन रिजिजू हे व्हिडिओत शर्ट, ट्राउजर्स आणि स्नीकर्समध्ये दिसत आहेत. गावकऱ्यांसोबत पारंपरिक लोकगीतावर नाचना दिसत आहेत. गावकरी पारंपरिक वाद्यांवर लोकगीत म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्या गाण्यावर रिजिजू नाचत असल्याचं व्हिडिओत दिसतंय. यावेळी उपस्थित असलेल्या इथर गावकऱ्यांनीही गाण्याच्या ठेक्यावर ताल धरली आणि टाळ्या वाजल्या.

रिजिजूंच्या डान्सचे पीएम मोदींनी केले कौतुक

केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला. पंतप्रधान मोदींनी रिजिजूंच्या डान्सचे कौतुक केले. केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजूही एक डिसेंट डान्सर आहेत. अरुणचल प्रदेशची प्रसिद्ध आणि गौरवशाली संस्कृती पाहून आनंद झाला, असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय.

यापूर्वी किरने रिजिजू यांनी आपल्या डान्सच्या व्हिडिओसोबत एक ट्विट केले होते. विवेकानंद केंद्र विद्यालय योजनेचा आढावा घेण्यासाठी कजलांग गावाचा शानदार दौरा झाला. पाहुणे आपल्या गावाला भेट देण्यासाठी येतात तेव्हा सजोलांग गावकऱ्यांकडून पारंपरिक मनोरंजन केले जाते. अरुणाचल प्रदेशातील प्रत्येक समाजासाठी मूळ लोकगीते आणि नृत्य प्रत्येक आवश्यक असतात’, असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं.

PM Poshan Scheme: मध्यान्ह भोजन आता ‘पीएम पोषण’, ११.८० कोटी विद्यार्थ्यांना लाभ

किरेन रिजिजू अरुणाचल प्रदेश पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि सोशल मीडियावर ते सक्रिय आहेत. आरोग्य आणि तंदुरुस्तीशी संबंधित व्हिडिओंसह, ते आपली गाणीही फॉलोअर्सना शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी एका कार्यक्रमादरम्यान किशोर कुमार यांचं गाणं गायलं होतं. तो व्हिडिओही त्यांनी शेअर केला होता.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: