महावितरणलाच शॉक! वीजबिल न भरल्यास गावागावात अंधार, पाणीही होणार बंद


हायलाइट्स:

  • पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य गावांची पथदिवे आणि सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची बिले थकली.
  • या गावांची वीज बिलांची थकबाकी १६१७ कोटीवर पोहोचली आहे.
  • यामुळे महावितरणने वसुलीसाठी आता वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य गावांनी पथदिवे आणि सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची बिले भरण्यास हात अखडता घेतला आहे. सरकारकडून निधी आल्यानंतर बिल भरण्याच्या मानसिकतेमुळे वीज बिलांची थकबाकी १६१७ कोटीवर पोहोचली आहे. यामुळे महावितरणालाच शॉक बसल्याने वसुलीसाठी आता वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईने गावागावात अंधाराबरोबरच पाणी पुरवठाही विस्कळित होणार आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांना पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या ४२ हजार २९ वीजजोडण्यांचे ३२ कोटी ६० लाख रुपयांचे चालू वीजबिल देण्यात आले आहेत. मात्र प्रामुख्याने ग्रामपंचायतींकडून चालू वीजबिलांचा देखील भरणा होत नाही अशी स्थिती आहे. याशिवाय मागील थकबाकी सोळाशे कोटीपेक्षा अधिक प्रलंबित आहे. त्यामुळे पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची चालू वीजबिले न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- यंदा नवरात्रोत्सवही साधेपणाने; महापालिकेची नियमावली जाहीर

पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामपंचायतींनी पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिले थकविल्याने महावितरणवरील थकबाकीचे ओझे वाढले आहे. पुणे जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या २५४३ वीजजोडण्यांचे १०९ कोटी ८० लाख तर पथदिव्यांच्या ७०५५ वीजजोडण्यांचे ४५२ कोटी ३२ लाख रुपये, सोलापूर जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या १९७९ वीजजोडण्यांचे ७५ कोटी ४४ लाख तर पथदिव्यांच्या ३८९५ वीजजोडण्यांचे ४६९ कोटी रुपये थकीत आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ३ हजारांवर नवे रुग्ण, मृत्यूंच्या संख्येत किंचित वाढ

सातारा जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या १८६१ वीजजोडण्यांचे १७ कोटी ५९ लाख तर पथदिव्यांच्या ४८४२ वीजजोडण्यांचे १९८ कोटी १३ लाख रुपये, कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या २६४२ वीजजोडण्यांचे ८८ कोटी ५३ लाख तर पथदिव्यांच्या २८७४ वीजजोडण्यांचे ७१ कोटी २४ लाख रुपये थकीत आहे. तर सांगली जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या १२०३ वीजजोडण्यांचे २६ कोटी ६९ लाख तर पथदिव्यांच्या २६६१ वीजजोडण्यांचे १०७ कोटी ६३ लाख रुपये थकीत आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईतल्या अंधशाळेतून नव्या अंध मत्स्यकुळातील प्रजातीचा शोध; संशोधकांमध्ये तेजस ठाकरेंचा समावेश

राज्यातील पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीजबिलांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाकडून समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच थकबाकीबाबत निर्णय होईपर्यंत तूर्तास ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीजबिलांची रक्कम दिलेल्या मुदतीत महावितरणकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार ही चालू वीजबिले भरली न गेल्यास संबंधीत पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीजबिलांचा भरणा करण्याची जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक व सरपंचांवर देण्यात आली आहे. त्यात दिरंगाई झाल्यास त्यांना वैयक्तिक जबाबदार धरण्यात येणार असल्याचे शासनाकडून लेखी पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: