दुर्गम आणि अतिदुर्गम भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री नबाव मलिक

दुर्गम आणि अतिदुर्गम भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री नबाव मलिक The government is trying to increase the number of vaccinations even in remote and extremely remote areas – Minister Nawab Malik
व्हॉट्सॲपद्वारे कोविड लस नोंदणी ॲपचे उद्घाटन
 मुंबई,Team DGIPR  सप्टेंबर 30, 2021 : कोविड लसीकरणामध्ये गोंदिया जिल्हा सर्वांत जास्त लसीकरण झालेला जिल्हा असून यापुढे दुर्गम आणि अतिदुर्गम भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया आणि नवाना टेक प्रा.लि. यांच्यात सामंजस्य करार होऊन व्हॉट्सॲपद्वारे कोविड लसीकरण नोंदणीच्या अँपचे उद्घाटन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले.

याप्रसंगी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, गोंदिया जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे, सहायक जिल्हाधिकारी अनमोल सागर, नवाना टेकचे राऊल नानावटी, गोंदिया आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

नवीन उद्योजक तयार करून रोजगारांच्या संधी निर्माण करू – मंत्री नबाव मलिक

ऑनलाईन उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमामध्ये मंत्री श्री.मलिक म्हणाले की, व्हॉट्सॲपद्वारे कोविड लसीकरण नोंदणीची सुरूवात होत असल्याने गोंदिया जिल्हा लसीकरणात पुढे जाणार असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यात आणखी काही सुविधा देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आपल्याकडे स्टॉर्टअप योजना असून ग्रामीण भागातील तरूणांकडे असलेल्या नवनवीन संकल्पना शोधण्यासाठी स्टार्टअप यात्रा सारखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातील तयार केलेल्या वस्तूंना मार्केटिंग करण्याची जबाबदारी फ्लिपकॉट ही कंपनी स्वीकारत असल्याचेही श्री.मलिक यांनी यावेळी सांगितले. जिल्हा प्रशासने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगाराच्या निर्मिती बरोबरच रोजगार देणारे उद्योजकही तयार करावेत, असे श्री.मलिक यांनी सांगितले.

प्रधान सचिव श्रीमती मनिषा वर्मा यावेळी म्हणाल्या की, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा असून सध्या उद्भवत असलेले कोविडचे आव्हान लक्षात घेता नवाना टेकने महत्त्वपूर्ण ॲप तयार केले आहे. लसीकरणात सामान्य माणसांचे जे काही गैरसमज आहे, त्या या ॲपच्या माध्यमातून नक्कीच दूर होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमित कोठावदे तर आभार प्रदर्शन कौशल्य विकास विभागाचे आयुक्त श्री.दीपेंद्र यांनी केले.

ॲपविषयी :

या तंत्रज्ञानाद्वारे, स्टार्टअपने मराठी भाषेत Whatsapp Voice Bot तयार केला आहे ज्याद्वारे ग्रामीण वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपवर वॉइस नोट्स मराठीत पाठवून लसीकरणासाठी बुकिंग करता येईल. मराठीतील आवाजाचा वापर महाराष्ट्रातील प्रत्येक वापरकर्त्याला शहरी किंवा ग्रामीण भागातील लसीकरण बुकिंग प्लॅटफॉर्मवर न्याय्य प्रवेश मिळू देईल. बोटचा वापर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरत असलेल्या चुकीच्या माहितीशी लढण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. नवाना टेकचे Speech Recognition Technology खालील मराठी बोलीभाषांसाठी (झाडी-बोली, वऱ्हाडी आणि प्रमाणित मराठी) घरगुती पद्धतीने बांधली गेली आहे आणि मराठी ओळखण्यात अत्यंत अचूकता दाखवली आहे.

स्टार्टअप वीक प्रकल्पाचा एक भाग म्हणून, गोंदिया जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हे तंत्रज्ञान वापरले जात आहे, कोरोना लसीकरणासाठी व्हॉट्सॲपद्वारे नोंदणीकरीता स्टार्टअप नवाना टेक लिमिटेड कंपनीद्वारे सदर ॲप तयार करण्यात आलेला आहे. नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून या ॲपचा उपयोग होणार आहे. जसे की, आपण कुठे राहता, आपली वय किती आहे अशाप्रकारे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सदर ॲपचा उपयोग नागरिकांना होणार आहे. सदर ॲप हा मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. कोणताही नागरिक आता त्याच्या जवळच्या केंद्रावर व्हॉट्सअँपद्वारे मोबाईल क्रमांक 85914 89232 वर नोंदणी करू शकतो. बॅकएंडवर, स्टार्टअपने व्हॉट्सअँपवर पूर्ण नोंदणीसाठी कोविन अँपसह एकत्रित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: