लग्नात जेवायला दिले नाही; फोटोग्राफरने नवरदेवासमोर डिलीट केले सगळे फोटो
लग्न सोहळ्यासाठीची फोटोग्राफी सकाळी ११ वाजता सुरू झाली आणि संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत सुरू होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जेवण देण्यात आले. त्यावेळी फोटोग्राफरसाठी टेबलवर जागा ठेवण्यात आली नव्हती. इतकंच नव्हे तर त्याला जेवणापासून रोखण्यात आले आणि फोटो काढण्यास सांगण्यात आले. लग्न सोहळा असलेल्या ठिकाणी असलेले उष्ण वातावरण आणि कामामुळे आपण प्रचंड थकलो होतो असे फोटोग्राफरने म्हटले. लग्न सोहळ्याच्या ठिकाणी ना एसी होती, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती असेही या फोटोग्राफरने म्हटले.
कामामुळे आणि उष्ण वातावरणामुळे थकलेल्या या फोटोग्राफरने मित्र असलेल्या नवरदेवाला जेवणासाठी २० मिनिटे विश्रांती मागितली. त्यावेळी नवरदेवाने त्याला फोटो काढत राहण्यास सांगितले. फोटो न काढल्यास पैसे मिळणार नसल्याचे त्याने म्हटले. नवरदेवाच्या या उर्मट उत्तरानंतर फोटोग्राफरच्या संतापाचा पारा चढला. त्यानंतर त्याने सर्व फोटो डिलीट केले आणि तेथून निघून गेला.