MIvs DC Match Preview: जिंका नाही तर घरी जा; प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला विजय हवाच
दिल्लीने ८ विजय मिळून प्ले ऑफमधील स्थान जवळ जवळ निश्चित केले आहे. गेल्या हंगामात उपविजेते राहिलेल्या दिल्लीचा प्रयत्न गुणतक्त्यात पहिल्या दोन स्थानावर राहण्याचा असेल. ज्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी मिळू शकतील.
मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात करुन दिली आहे. पण मधळ्या फळीतील फलंदाजांची कामगिरी खराब होत चालली आहे. गेल्या लढतीत कोलकाताविरुद्ध मुंबईने सहा विकेटनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात सौरभ तिवारीने ४५ तर हार्दिक पंड्याने ४० धावा केल्या होत्या. मुंबईसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागले. कायरन पोलार्डने ७ चेंडूत नाबाद १५ धावा करत फिनिशरची भूमिका पार पाडली होती. पण सूर्यकुमार यादव अद्याप फॉर्ममध्ये आलेला नाही. हा मोठा काळजीचा विजय असेल. इशान किशनला आणखी एक संधी मिळते का हे पाहावे लागले.
गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. पण फिरका गोलंदाज अद्याप विकेट शोधत आहेत. राहुल चाहर आणि क्रुणाल पंड्या यांच्यावर चांगली गोलंदाजी करण्याचा दबाव असले.