‘…तेव्हाच मोदी सरकार विरोधातील आपली लढाई संपेल’


हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा इगतपुरीमध्ये
  • जयंत पाटील यांनी साधला मोदी सरकारवर निशाणा
  • २०२४ पर्यंत मोदी सरकार विरोधात लढाई सुरूच राहील – पाटील

नाशिक: ‘देशात अनेक संस्थांचं खासगीकरण होताना दिसत आहे. मागच्या ६० ते ७० वर्षांत जे देशात उभं राहिलं, ते विकण्याचं काम मोदी सरकार करत आहे. त्यामुळं ही लढाई संपलेली नाही. आता सरकारमध्ये असलो तरी ही लढाई २०२४ पर्यंत आपल्याला लढायची आहे. त्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकल्यानंतरच ही लढाई संपेल,’ असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज केलं.

‘मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळसाहेबांनी अभ्यास करून मंत्रिमंडळात मांडणी केली आहे. आज ओबीसी आरक्षणासाठी ते लढा देत आहेत. इम्पिरिकल डेटाची मागणी करूनही केंद्रसरकार टाळाटाळ करत आहे, यावरून हे सरकार ओबीसीविरोधात आहे हे लक्षात येतं,’ असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. ‘ईडीचा गैरवापर करण्यात आला, त्याचं उदाहरण भुजबळ साहेब आहेत. भुजबळ साहेबांना महाराष्ट्र सदन प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलं, याकडं पाटील यांनी लक्ष वेधलं.

वाचा: खडसेंनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे मिळवले?; गिरीश महाजनांचा सवाल

मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भूमिका कळावी यादृष्टीने ही परिवार संवाद यात्रा असल्याची माहिती यावेळी जयंत पाटील यांनी दिली. पक्ष वाढवायचा असेल तर २८८ मतदारसंघांपर्यत गेले पाहिजे. या मतदारसंघात निवडणूक लढवली की नाही यापेक्षा कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, हे माझं काम आहे. बर्‍याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी मौलिक सूचना केल्या आहेत. त्याचा विचार पक्ष नक्की करेल. सरकारची कर्जमाफी व भुजबळ साहेबांची शिवभोजन थाळी लोकप्रिय झाली आहे. गरीबातील गरीब माणसला या योजनेचं किती आकर्षण आहे हे लक्षात आलंय. सरकारनं ज्या योजना केल्या आहेत, त्या तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे.

वाचा: गिरीश महाजनांचा खडसेंवर जोरदार पलटवार; म्हणाले, तुम्ही रॉकेल टाकून…

‘पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदा या आमदारकीचा पाया आहे. त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घवघवीत यश प्राप्त करू या. प्रत्येक ठिकाणी आपली शक्ती उभी करायची आहे. स्वतःची ताकद उभी करा, जेणेकरून आपण आपल्या ताकदीवर निवडून येऊ,’ असं भुजबळ म्हणाले. ‘इगतपुरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे, असं आवाहनही त्यांनी केलं.

वाचा: ‘खडसेंनी शूटर लावून मला मारून टाकावे, पण लेव्हल सोडून बोलू नये’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: