कर्णधाराला वाचवण्यासाठी IPLमधील संघ हा प्रकार करतात; गौतम गंभीरने केला मोठा आरोप
कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळून देणाऱ्या गंभीरने एका वृत्तपत्रात लिहलेल्या कॉलममध्ये म्हटले आहे की, आयपीएलमध्ये अधिक तर संघ उपकर्णधाराची निवड योग्य पद्धतीने करत नाहीत. आयपीएलमधील सिस्टम अशी आहे की उप कर्णधाराला गुणांच्या आधारावर नव्हे तर तो किती आज्ञाधारक आहे किंवा फार महत्त्वाचा नाही यावर निवडले जाते. हे यासाठी केले जाते की कर्णधार सुरक्षित रहावा.
वाचा- आयपीएलशतकानंतर पुण्याच्या ऋतुराजने सर्वांचे मन जिंकले; म्हणाला, टीम आधी मग…
आयपीएलमधील अधिकतर संघ हे टीममधील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू निवडण्याची संधी गमावतात, असे देखील त्याने म्हटले आहे. चांगला कर्णधार असणे गरजेचे आहे. पण उपकर्णधाराची भूमिका देखील फार महत्त्वाची आहे. मला वाटत नाही की आपल्याकडे उपकर्णधाराच्या भूमिकेला फार महत्त्व दिले जाते. आपल्याकडे उपकर्धाराची निवड गुणांच्या आधारावर केली जात नाही.
आयपीएलचा १४वा हंगाम युएईमध्ये सुरू आहे. साखळी फेरीतील काही सामने शिल्लक असून चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सने प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे स्थान देखील निश्चित मानले जात आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी चार संघात स्पर्धा आहे.