औषधशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; डेव्हिड ज्युलिअस आणि अर्डेम पटापाउटियन यांचा सन्मान


स्टॉकहोम: अमेरिकन शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलिअस (David Julius) आणि अर्डेम पटापाउटियन (Ardem Patapoutian) यांना औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ष २०२१ च्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

नोबेल पुरस्कार समितीचे महासचिव थॉमस पर्लमॅन यांनी आज याबाबतची घोषणा केली. तापमान आणि स्पर्शामधील रिसेप्टर्सच्या संशोधनासाठी संयुक्तपणे डेव्हिड ज्युलिअस आणि अर्डेम पटापाउटियन यांना औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे.

मागील वर्षी औषधशास्त्राचा नोबेल पुरस्कार हार्वे अल्टर, मायकल होउगटन आणि चार्ल्स राइस यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला होता. रक्तातून निर्माण होणाऱ्या हिपाटायटिस आजाराविरोधातील लढाईत या शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे आहे. हिपाटायटिसच्या आजारामुळे मोठ्या संख्येने लोकांना सायरोसिस आणि यकृताचा कर्करोग होतो. या तिन्ही शास्त्रज्ञांनी ‘हिपाटायटिस सी’ ची ओळख पटवता येईल अशा एका नोवल विषाणूचा शोध लावला होता.

नोबेल पुरस्काराचा इतिहास

नोबेल पुरस्कार जगभरात प्रतिष्ठेचा समजला जातो. हा पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ ‘नोबेल पुरस्कार’ दिले जातात. दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनी, १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होतो. वैद्यकशास्त्रासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: