sanjay raut met rahul gandhi : राहुल गांधींसोबत अशी काय झाली चर्चा, संजय राऊत का सांगत नाहीत?


नवी दिल्लीः देशात सुरू असलेल्या काही मुद्द्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात दिल्लीत बैठक ( sanjay raut met rahul gandhi ) झाली. संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली. देशात लोकशाही राहिली आहे का? लोकशाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, असं राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले. तसंच राहुल गांधींसोबत काय चर्चा झाली? या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मात्र संजय राऊत यांनी टाळलं. तसंच दोघांमधील चर्चा जाहीर करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

ही सदिच्छा भेट होती. बऱ्याच मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. काँग्रेसबाबत काही मुद्द्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर राहुल गांधी समाधानी आहेत. पण चर्चेतील सर्वकाही बाबी सांगता येत नाहीत. त्या चार भींतीतल्याच असतात, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या बोलण्याचा रोख कुठल्या मुद्द्यावर होता हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. लखीमपूर खिरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात एका स्थानिक पत्रकारासह एकूण ८ जणांचा मृत्यू झाले आहेत. प्रियांका गांधींना केलेली अटक आणि शेतकऱ्यांना भेटायला जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या रोखल्याप्रकरणी संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. विरोधी पक्षांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असं राहुल गांधींची भेट घेण्यापूर्वी संजय राऊत म्हणाले. लखीमपूरची घटना लांछनास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं.
Lakhimpur Violence: माझ्या मुलाविरुद्ध पुरावा दाखवा, त्याक्षणी राजीनामा देईन : केंद्रीय मंत्री अजय मिश्र

लखीमपूर खिरीमधील हिंसाचाराच्या घटनेने देश हादरला आहे. प्रियांका गांधींना अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना पीडित शेतकरी कुटुंबांना भेटण्यापासून रोखलं जात आहे. यामुळे यूपी सरकारच्या या कारवाईविरोधात संपूर्ण विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची गरज आहे, असं राऊत म्हणाले.

bhupesh baghel : छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा लखनऊ विमानतळावर ठिय्या; ट्विट करून सांगितलं…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: