T20 World Cup : बीसीसीआय होणार मालामाल; यामुळे कोट्यवधींचा होणार फायदा


नवी दिल्ली : या महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे पडघम वाजू लागले आहेत. ही स्पर्धा भारतात पार पडणार होती, पण कोरोना स्थिती गंभीर झाल्याने विश्वचषकाचे सर्व नियोजन यूएई आणि ओमानला हलविण्यात आले. बीसीसीआयने या स्पर्धेची तिकिटे विकण्याचे अधिकार ओमान आणि ईसीबीला दिले आहेत. या स्पर्धेच्या तिकीट विक्रीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळेल, असा आशावाद बीसीसीआयने व्यक्त केला आहे.

वाचा-रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या विजयाबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाला, ठरवूनच जिंकलो !

यूएई क्रिकेट बोर्डला (ईसीबी) ३९ सामन्यांचे आयोजन करण्यासाठी सात दशलक्ष डॉलर्स दिले जाणार आहेत. तर ओमान क्रिकेट बोर्डला पहिल्या फेरीच्या सहा सामन्यांसाठी तीन कोटी रुपये दिले जातील. असे असूनही, बीसीसीआयला यातून १२ दशलक्ष डॉलर्सचा फायदा होणार आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने याबद्दल सांगितले आहे.

वाचा- धोनीच्या निवृत्तीवर CSK ने दिलं मोठं अपडेट; वाचा सविस्तर बातमी

बीसीसीआयला ८९ कोटी रुपये मिळणार
बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने असेही सांगितले की, या स्पर्धेचा एकूण खर्च २५ दशलक्ष डॉलर आहे. (१ अब्ज ८६ कोटी रुपये). नियोजित खर्चापेक्षा १२ दशलक्ष डॉलर म्हणजे ८९ कोटी रुपये अधिक आहे. तसेच पुढील वर्षी ऑस्ट्रेलियातील होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेवर खर्च होणाऱ्या किंमतीपेक्षा हे अजूनही कमी आहे. बीसीसीआयने या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने युएई आणि ओमानमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आयसीसीशी होस्टिंगच्या मुद्द्याबाबत चर्चा केली होती. खेळाडूंची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे, असा आम्ही विचार केला. त्यामुळे आम्ही ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.

वाचा- चक दे इंडिया! FIHच्या सर्व पुरस्कारांवर भारतीय हॉकी खेळाडूंनी कोरलं नाव

बीसीसीआयकडे नाहीत तिकीट विक्रीचे अधिकार
क्रिकबझच्या बातमीनुसार, बीसीसीआय दुबई, अबू धाबी आणि शारजाहमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन करत आहे. यासाठी, बीसीसीआय युनायटेड क्रिकेट बोर्डला १.५ दशलक्ष डॉलर (११ कोटी रुपये) आणि ऑपरेशनल खर्चासाठी ५.५ दशलक्ष डॉलर्स देईल. बीसीसीआय एकूण सात दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५२ कोटी रुपये देणार आहे. सामन्यादरम्यान आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवणे हे ईसीबीचे काम असेल. बीसीसीआयने आपली तिकिटे ईसीबीला विकण्याचे अधिकार दिले आहेत, यामधून मिळणार सर्व नफा ईसीबीकडेच राहील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: