शासनाच्या मार्गदर्शक निर्देशाप्रमाणे जवळपास दिड वर्षांनी राज्यातील मंदिरे खुली
शासनाच्या मार्गदर्शक निर्देशाप्रमाणे जवळपास दिड वर्षांनी राज्यातील मंदिरे खुली
पंढरपूर /नागेश आदापूरे,07/10/2021 – आज गुरुवार दि ०७/१०/२०२० अश्विन शु .१ रोजी घटस्थापना ,शारदीय नवरात्रारंभ व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक निर्देशाप्रमाणे मंदिरे खुली करण्यात आली आहेत.त्यामुळे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास तसेच संपुर्ण मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे . या आरासीमुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे .या फुलांची आरास करणाऱ्या भाविकांचे नांव राम जांभुळकर ,पुणे असून आरास करण्यासाठी वापरण्यात आलेल्या फुलांचे प्रकार आणि आरास करण्यात आलेल्या फुलांचे प्रमाण लक्षावधी तुळशीच्या पानांपासुन , झेंडू , गुलाब , आष्टर ,शेवंती ,जरबेरा ,कागडा ,कामीनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला असून अश्विन शु .१ रोजी घटस्थापना , शारदीय नवरात्रारंभ निमित्त १० ते १५ रंगसंगती वापरून आरास करण्यात आली यात साधारणतः २.५ टन फुले वापरण्यात आली.

हे डेकोरेशन वाघोले फ्लॉवर्स डेकोरेटर्स , पुणे यांनी केले असून मंदिर समितीचे कर्मचारी यांनी मदत केली असल्याची माहिती श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर कार्यकारी अधिकारी आणि पंढरपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली .
