जगातील पहिल्या मलेरियाविरोधी लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी


जीनिव्हा: जगातील पहिल्या मलेरियाविरोधी लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने या लशीला मंजुरी दिली आहे. जगभरात मलेरियामुळे एका वर्षात सरासरी चार लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यामध्ये आफ्रिका खंडातील बालकांची संख्या लक्षणीय आहे.

आफ्रिका खंडातील घाना, केनिया आणि मलावी या देशांमध्ये २०१९ पासून प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या मोहिमेच्या समिक्षेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. मलेरियाच्या लशीचे २० लाखांहून अधिक डोस देण्यात आले.

हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेरेयेसस यांनी म्हटले. बालकांसाछी दीर्घकाळ प्रतिक्षित असलेल्या मलेरियाच्या लशीला मंजुरी देण्यात आली आहे. या लशीमुळे मलेरिया नियंत्रित ठेवण्यात मोठे यश मिळेल. मलेरिया रोखण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या उपचारांसह या लशीचा वापरामुळे दरवर्षी हजारोजणांचे प्राण वाचवता येणे शक्य होणार आहे.

Explainer रेणू निर्माण करणाऱ्या यंत्राला का मिळाला यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार
जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक मलेरिया प्रोग्रामचे महासंचालक पेड्रो अर्लोसो यांनी म्हटले की, वैज्ञानिक दृष्टिकोणातून हे मोठे यश आहे. ही लस प्लाज्मोडियम फाल्सीपेरम विरोधात काम करते. परजीवी प्रजातींमधील ही एक घातक प्रजाती आहे.

अमेरिकेजवळ ‘इतका’ आहे अण्वस्त्र साठा; परराष्ट्र विभागाने प्रसिद्ध केली संख्या
आफ्रिकेत सर्वाधिक मृत्यू

आफ्रिका खंडातील गरिब देशांमध्ये मलेरियाच्या आजारामुळे दरवर्षी हजारो बालके दगावतात. पाच वर्षाखालील वयाच्या जवळपास दोन लाख ६० हजार बालकांचा दरवर्षी मृत्यू होतो. आफ्रिका खंडातील उप-सहारा भागात मलेरियाने थैमान घातले आहे.

मलेरियाची लक्षणे

ताप येणे, डोके दुखी आणि मांसपेशी दुखणे, थंडी वाजणे, ताप आणि घाम येणे आदी लक्षणे मलेरिया आजाराची लक्षणे आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: