Gurmeet Ram Rahim: ‘डेरा’ सदस्य रणजीत सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम दोषी!


हायलाइट्स:

  • डेरा व्यवस्थापन समितीचा माजी सदस्य रणजीत सिंह हत्या प्रकरण
  • विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय
  • गुरमीत राम रहीम सध्या सुनारिया तुरुंगात बंद

चंदीगड : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमम याला रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय. पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयानं हा निर्णय सुनावला आहे. १२ ऑक्टोबर रोजी गुरमीर राम रहीम याच्या शिक्षेचा निर्णय जाहीर करण्यात येईल.

न्यायालयानं या प्रकरणात राम रहीमसहीत इतर चार जणांना दोषी ठरवलंय. कृष्ण लाल, सबदिल, अवतार, जसबीर अशी या चार दोषींची नावं आहेत. तर याच प्रकरणातील आणखी एक आरोप इंदरसेन याचा अगोदरच मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी सुनावणीसाठी गुरमीर राम रहीम आणि कृष्ण लाल याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. तर आरोपी अवतार, सबदिल आणि जसबीर यांना प्रत्यक्षरुपात न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

Ashish Mishra: लखीमपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा नेपाळला पळाल्याचा दावा
धक्कादायक! ३१ वर्षे सतत सुरू होता सामूहिक बलात्कार, अखेर पीडित महिलेने….
गुरमीत सध्या सुनारिया तुरुंगात

या अगोदर, एका साध्वीच्या लैंगिक शोषण प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला २५ ऑगस्ट २०१७ रोजी दोषी ठरवण्यात आलं होतं. या प्रकरणात त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. तसंच पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरणात गुरमीत सध्या सुनारिया तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.

रणजीत सिंह हत्या प्रकरण

१० जुलै २००२ मध्ये डेरा व्यवस्थापन समितीचा सदस्य राहिलेल्या कुरुक्षेत्राच्या रणजीत सिंह याची हत्या करण्यात आली होती. साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात समोर आलेलं निनावी पत्र रणजीत सिंह यानंच आपल्या बहिणीकडून लिहून घेतल्याचा संशय गुरमीत राम रहीम आणि इतर आरोपींना होता. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. रणजीत सिंह हत्या प्रकरणात पोलीस चौकशीवर नाखुश असलेल्या रणजीत याच्या वडिलांनी जानेवारी २००३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सीबीआयनं तपास आपल्या हाती घेऊन २००७ मध्ये कोर्टासमोर चार आरोपींवर आरोप निश्चित केले होते.

India China: अरुणाचलच्या तवांग भागातही भारत – चिनी सैन्य आमने-सामने, LAC चा वाद
bjp national executive : भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीतून गांधी मायलेकांना डच्चू, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांची वर्णीSource link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: