दादा महाराजांच्या स्वभावाची परंपरा निरंजन महाराजांकडे – ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर

दादा महाराजांच्या स्वभावाची परंपरा निरंजन महाराजांकडे – ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर

पंढरपूर / प्रतिनिधी – सांप्रदायिकतेमध्ये परंपरा अविरत चालणे महत्वाचे असते. यामध्ये प्रवचन किर्तने अशा परंपरेतील गोष्टी चालत राहतील. मात्र विचार आणि स्वभावाची परंपरा अबाधित राहणे महत्वाचे असते. अशीच वै. दादा महाराज मनमाडकर यांच्या स्वभावाची परंपरा निरंजन महाराज समर्थपणे चालवतील, असा विश्वास ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांनी बोलताना व्यक्त केला.

नवरात्रीच्या निमित्ताने येथील मनमाडकर कुटुंबिय व संतप्रसाद शिक्षण संस्थेचे विश्वस्त भगवान मनमाडकर यांच्या माध्यमातून श्रीमद देवी भागवत कथेचा शुभारंभ झाला. ह.भ.प. निरंजन महाराज मनमाडकर यांच्या सुश्राव्य वाणीतून घटस्थापनेपासून दसर्यापर्यत देवीभागवत सुरू असणार आहे.यांच्या प्रारंभी ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर ,ह.भ.प.जयवंत महाराज बोधले , ह.भ.प.शंकर महाराज बडवे,ह.भ.प.मदन महाराज हरिदास ,ह.भ.प.ऋषिकेश महाराज उत्पात, ह.भ.प.दिलीप महाराज साठे आदिंच्या हस्ते रूक्मिणी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून देवी भागवत कथेस प्रारंभ झाला.

पुढे बोलताना चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले , दादा महाराज मनमाडकर म्हणजे सांप्रदायिकते मधील एक गोड पाण्यासारखे मवाळ पण संत साहित्याच्या विचारांचे आदर्श व्यक्तीत्व होते. त्यांच्यानंतर त्यांच्या स्वभावाची आणि विचारांची परंपरा आता निरंजन महाराजांच्या रूपाने पुढे चालेल. सांप्रदायात किर्तन प्रवचनाची परंपरा चालूच राहते. पण मूळपुरूषांच्या विचारांची आणि स्वभावाची परंपरा आबधित राहणे महत्वाचे असते आणि हेच काम आता निरंजन महाराज करतील.

याप्रसंगी बोलताना जयंवत महाराज बोधले म्हणाले , मनमाडकर घराण्यात गयामाता तसेच दादा महाराज हे ज्ञानदान करणारे होते. ज्ञानदानी घराणे म्हणून मनमाडकर कुंटुबाकडे पाहीले जाते. याच घराण्यातील ज्ञानयज्ञांची परंपरा आता निरंजन महाराजाकडे आहे. देवी भागवताच्या माध्यमातून नवरात्रीत मातेचा जागर ते आता करतील यांचा भक्तांनी श्रवणांचा लाभ घ्यावा .

यावेळी दिलीप महाराज साठे, शंकर महाराज बडवे, ऋषिकेश महाराज उत्पात यांची आशीर्वादपर मनोगते झाली. या सप्ताहाच्या उदघाटनाचा सुरूवात शुभांगीताई मनमाडकर यांच्या अभंग गायनाने झाली. सदरचा सप्ताह यशस्वी करण्यासाठी भगवानराव मनमाडकर , धनंजय मनमाडकर , आरती मनमाडकर , पल्लवी मनमाडकर तसेच आत्मा मलिक ध्यान मंडळ आदि परिश्रम घेत आहेत. आरोग्यविषयक नियंम पाळून हा सोहळा ऑफलाईन आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: