‘पवारांनी लायसन्स नसलेल्या ड्रायव्हरला थेट व्होल्वो बस चालवायला दिली’


हायलाइट्स:

  • गुलाबराव पाटील यांची पंढरपूरमध्ये जोरदार फटकेबाजी
  • नारायण राणे यांच्यावर केली बोचरी टीका
  • उद्धव ठाकरेंच्या प्रशासकीय कौशल्याचं केलं कौतुक

पंढरपूर: ‘कुठलीही गाडी चालवायची असेल, मग ती मोटारसायकल असेल किंवा एसटी, त्यासाठी लायसन्स लागतं. एखादा काम करायचं असेल तर अनुभवाचं किंवा पात्रतेचं प्रमाणपत्र लागतं, पण शरद पवार साहेबांनी असं काही केलं की व्होल्वो गाडीवर बिना लायसन्सचा ड्रायव्हर बसवून दिला,’ अशा शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडं आकस्मिक आलेल्या मुख्यमंत्रिपदाचं वर्णन केलं.

ते पंढरपुरात बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून ते पडण्याच्या तारखा विरोधकांकडून दिल्या जात आहेत. मात्र, लवकरच हे सरकार दोन वर्षे पूर्ण करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या मजबुतीचा दाखल देताना गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत मुख्यमंत्र्यांच्या कौशल्याचा दाखला दिला. ते म्हणाले, ‘२०१९ मध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं त्याआधी कुणा साधू किंवा ज्योतिषानं सांगितलं असतं तर त्याला वेड्यात काढलं गेलं असतं. पण आज ते वास्तव आहे. ज्यानी आयुष्यात कधी मोटारसायकल किंवा गाडी चालवली नव्हती, त्यांना डायरेक्ट व्होल्वो गाडीवर बसवलं गेलं. उद्धव साहेब ड्रायव्हर झाले. अजित पवार कंडक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं होतं की हा ड्रायव्हर अपघात करेल. पण तसं काही झालं नाही. मागच्या दोन वर्षांत वर्षांत अनेक वळणं आणि अडथळे आले तरी आमची तीन लोकांची गाडी बरोबर आणि सुस्साट चालतीय,’ असा दावा त्यांनी केला.

‘शिवसेना हे अजब रसायन, इथं सायकल चोर मुख्यमंत्री झाला’

‘शिवसेना हे रसायनच अजब आहे. टोपली विणणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले. पिपाणी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. रिक्षाचालक दिलीप भोळे आमदार झाले. पानटपरी चालवणारा गुलाबराव पाटील मंत्री झाला. हे सोडाच, सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, असं हे रसायन आहे,’ अशा शब्दांत पाटील यांनी शिवसेना या संघटनेचा गौरव केला.

हेही वाचा:

‘महाराष्ट्राला आता शमीच्या झाडावरील शस्त्रे काढावीच लागतील’

अजून तरी देशानं लाज सोडलेली नाही, २०२४ मध्ये ते दिसेल; राऊतांचा भिडेंना टोलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: